Gokul Doodh Sangh Agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Doodh Sangh : ‘गोकुळ’च्या कार्यालयावर दूध उत्पादकांचा मोर्चा

Dairy Farmers : ‘संघाने दूध कपात मागे घेतली नाही तर आम्ही अन्य दूध संघाना दूध घालू, असा पवित्रा उत्पादकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने गायीच्या दूध दरात कपात केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’च्या कार्यालयावर मंगळवारी (ता. ३) मोर्चा काढला. या वेळी दूध दरकपात मागे घेण्याची विनंती आंदोलकांनी केली.

‘संघाने दूध कपात मागे घेतली नाही तर आम्ही अन्य दूध संघाना दूध घालू, असा पवित्रा उत्पादकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. गोकुळ ही मातृसंस्था आहे. ही संस्था टिकावी म्हणून हक्कासाठी मोर्चा काढला आहे. तत्काळ दर पूर्ववत केले नाहीत तर आमच्याकडे दुसरे पर्याय खुले असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला.

‘गोकुळ’ने दोन दिवसांपूर्वीच गायीच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात केली होती. या विरोधात जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेक ग्रामस्थांनी निदर्शने करत या दरवाढीविरोधात आवाज उठविला होता. मंगळवारी करवीर तालुक्‍यातील दूध उत्पादकांनी दूध संघावर मोर्चा काढला.

अलीकडच्या काळात दुग्ध व्यवसाय करणे आव्‍हानात्मक बनले आहे. यातच संघाने गायीच्या दुधाचे दर कमी केल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. संघाने दरवाढ मागे घेतली नाही तर अन्य संघांना दूध घालू , असा पवित्रा दूध उत्पादकांनी घेतला.

अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बाजारपेठेतील परिस्थितीनुसार दर कमी केल्‍याचे या वेळी सांगितले. मोर्चात करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, विष्णू राऊत, रंगराव बचाटे आदीसह दूध उत्पादक सहभागी झाले.

‘मागणी संचालक मंडळापुढे ठेवू’

म्हशीच्या दुधाला मागणी असल्याने आम्ही म्हशीच्या दुधाच्या दरात तातडीने वाढ केली. परंतु गायीच्या दुधाबाबत विपरीत परिस्‍थिती आहे. खासगी दूध संघांनीही दुधाच्या किमती केल्या आहेत. काही संघ येथून पुढील काळात दर कमी करण्‍याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी केलेली ही मागणी संचालक मंडळापुढे ठेवू, असे आश्वासन डोंगळे यांनी दूध उत्पादकांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT