Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : मंत्र्यांकडूनच दूध उत्पादकांची बदनामी

Dairy Farmer Issue : दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत.

Team Agrowon

Nagar News : दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकासमंत्री महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे, असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात.

परिणामी, महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते आणि परराज्यांतल्या खासगी दूध संस्थांची चंगळ होते, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. या बाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याचे थोरात यांनी सांगितले.

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात, बाळासाहेब थोरात यांनी सांगितले, की दूधदराच्या संदर्भात राज्यभर आंदोलने सुरू आहे. २४ ते २५ रुपये दराने शेतकऱ्यांना दूध विकावे लागते, दुधाच्या पाठीमागची मेहनत मोठी आहे त्यामुळे पंचवीस रुपयाने दूध विकणे शेतकऱ्याला परवडू शकत नाही. ३४ ते ३५ रुपयांचा भाव मिळाला पाहिजे.

सरकारने फक्त दुधाचे भाव जाहीर करण्याची नौटंकी केली अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. दुधाच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ग्रामीण भागात. यापूर्वी देखील ज्या ज्या वेळी हा व्यवसाय अडचणीत आला तेव्हा तेव्हा सरकार दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे.

दूध संस्था मोडीत काढण्याचे काम ः थोरात

परराज्यांतील दूध संस्था महाराष्ट्रातल्या सहकारी दूध संस्थांना मोडीत काढण्याचे काम करत आहेत. जेव्हा शेतकऱ्यांना भावाची गरज असते तेव्हा या संस्था, शेतकऱ्यांना कमी भाव देतात.

ज्या काळात दुधाचे दर स्थिर असतात त्या काळात या परराज्यांतील संस्थांकडून अकारण स्पर्धा तयार करून सहकारी संस्था उद्ध्वस्त केल्या जातात. आणि जेव्हा मक्तेदारी तयार होते तेव्हा शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम या परराज्यातील संस्था करतात असाही आरोप आमदार थोरात यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT