Labor Migration Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane Season 2024 : यंदाचा ऊस गळीत हंगाम काहीसा उशिराने सुरू झाला. त्यातच शेतकऱ्यांना यंदाच्या ऊस गळीत हंगामाचे वेध लागलेले आहे.

Team Agrowon

Nashik News : यंदाचा ऊस गळीत हंगाम काहीसा उशिराने सुरू झाला. त्यातच शेतकऱ्यांना यंदाच्या ऊस गळीत हंगामाचे वेध लागलेले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या मतदानासाठी ऊसतोड मजूर अजून थांबलेले होते.

मात्र मतदान संपताच बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील तळवाडे दिगर, भवाडे, मळगावसह परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्या ऊसतोडणी मजुर पुन्हा कामासाठी परतले आहेत. या हंगामी स्थलांतरामुळे ओस पडू लागल्या आहेत.

तळवाडे दिगरसह परिसरातील गावातील ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी जाण्यास सज्ज झाले असून, या मजुरांची कित्येक वर्षापासून दिवाळीही उसाच्या फडात होत असे. पण यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मतदानामुळे दिवाळी सन घरी साजरा करण्याचा योग त्यांना मिळाला.

मतदान करून गावागावातील तांडे आता ऊसतोडणीसाठी रवाना होत आहेत. यंदा विधानसभा निवडणूक असल्यामुळे कारखान्याचा लांबलेल्या गळीत हंगामामुळे दिवाळी सण आपापल्या घरीच साजरा करण्याचा योग ऊसतोड मजुरांना आला. त्यांची दिवाळी घरी झाली. तालुक्यातून शेकडो कुटुंबाच्या कुटुंब ऊसतोडणीसाठी संपूर्ण जिल्ह्यासह पुणे, सोलापूर, पंढरपूर, अहिल्यानगर, धाराशीवसह वेगवेळ्या जिल्ह्यांत स्थलांतर करत आहेत.

कोयत्याला धार लावून कारखान्याच्या दिशेने

अन्नधान्य, सरपण आणि कपड्यांचे गाठोडे असा संसार घेऊन हे ऊसतोड मजुरांचे तांडे आपल्या कोयत्याला धार लावून कारखान्याच्या दिशेने आगेकूच करत आहेत. मोडका संसार पाठी घेत मूलबाळ घरी ठेवून शेकडो कामगार कारखान्याकडे निघालेले आहेत.

मिळविलेल्या उचलीतून आगामी वर्षाचे नियोजन करत लेकराबाळांच्या शिक्षणाचा खर्चाची तजवीज करून आगामी ४-५ महिने आपल्या घरापासून कोणत्यातरी फडात आता हे मजूर आपला प्रवास सुरु करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT