Space Research Agrowon
ॲग्रो विशेष

Space Agriculture Research : पालकाच्या तंतुग्रंथींमध्ये अंतराळात वाढ

ISRO POEM-4 Module : अंतराळात वनस्पतींच्या वाढीविषयी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. ‘इस्रो’च्या ‘पोएम-४’ मॉड्यूलमध्ये पालकाच्या तंतुग्रंथींची वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील अमिटी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयोगातून अंतराळात अन्न आणि पौष्टिक आहार उत्पादनाच्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात.

Team Agrowon

Space Farming : ‘इस्रो’च्या ऑर्बिटल एक्सिरिमेंट मोड्यूलमध्ये (पीओईम- पोएम-४) पालकाच्या तंतुग्रंथींची वाढ होत असल्याचे दिसून आल्याची माहिती या प्रयोगाशी संबंधित मुंबईतील अमिटी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सोमवारी दिली.

‘पोएम-४’ हे मोड्यूल पृथ्वीपासून ३५० किलोमीटर अंतरावरील कक्षेत फिरत आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाखाली अंतराळात वाढणारी वनस्पती हा अवकाशातील जैविक संशोधनासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच दीर्घ कालावधीच्या मानवी मोहिमांमध्ये अंतराळवीरांसाठी एक वेगळा उपक्रम ठरणार आहे.

‘पोएम-४’कडून मिळालेल्या माहितीनुसार पालकाच्या तंतुग्रंथींची वाढ होत असल्याचे दिसून आल्याचे अमिटी विद्यापीठाचे कुलगुरू ए. डब्ल्यू. संतोष कुमार यांना सांगितले. ‘इस्रो’कडून मिळालेली माहिती उत्साहवर्धक आहे आणि त्यांची स्थितीही उत्तम आहे, असे ते म्हणाले.विद्यापीठाच्या खगोलविज्ञान विभागाचे कुमार हे मुख्य शास्त्रज्ञ आहेत.

प्रयोगाचा उद्देश

अंतराळ मोहिमेदरम्यान वनस्पतींच्या वाढीतून अन्न आणि पौष्टिक आहार उपलब्ध करणे.

अंतराळात वनस्पती गुरुत्वाकर्षण आणि प्रकाशाची दिशा कशी जाणतात आणि गुरुत्वाकर्षणाच्या ताणाशी जमवून घेण्यासाठी कसा बदल करतात, हे जाणून घेणे.

पृथ्वीवरील वनस्पतींच्या वाढीला चालना देण्यासाठी तसेच दीर्घकाळापर्यंत अंतराळ उड्डाण मोहिमेची मूलभूत गरज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT