Karai Soh Sorghum Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Variety : कराई सोह ज्वारीची सातपुड्यात चाचणी

Karai Soh Sorghum : मेघालयातील कराई सोह हा ज्वारी वाण बामखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी मागविला आहे.

Team Agrowon

Nandurbar News : मेघालयातील कराई सोह हा ज्वारी वाण बामखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी मागविला आहे. त्यावर सातपुडा पर्वत भागात किंवा नंदुरबार जिल्ह्यात विविध स्तरावर चाचण्या, प्रयोग केले जाणार आहेत.

सपाट व दुर्गम भागात या वाणावर प्रयोग केले जातील. शहादा तालुक्यातील टेंभे या भागात काळ्या कसदार जमिनीत व सातपुडा पर्वतात अक्राणी तालुक्यातील काकडदा या दुर्गम भागात हा वाण देण्यात आला आहे.

यंदा खरिपात या वाणावर प्रयोग केला जाईल. मेघालयमधील शिलाँग येथील वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. अॅबेलमॉन यांच्याकडून डॉ. पाटील यांनी हा वाण प्रयोगासाठी मागवून घेतला आहे. डॉ. अॅबेलमॉन या शिलाँग येथील शासकीय महाविद्यालायात वनस्पतिशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत.

मानी ज्वारीशी मेळ

कराई सोह हा ज्वारी वाण सातपुड्यातील मानी ज्वारी किंवा स्वीट सोरगम या ज्वारी वाणा सारखाच आहे. हा वाण सातपुड्यात आहे. त्याचे बऱ्यापैकी उत्पादन येते. लाल भाकरी यातून मिळते. या धर्तीवर कराई सोह वाण किती लाभदायी ठरू शकेल, यासंबंधी कार्यवाही केली जाईल.

ज्वारीची वैशिष्ट्ये

अमाईनो अॅसिड घटक, साखरेचे घटक.

मध्यम, हलक्या जमिनीतील रोगप्रतिकारक्षमता व टिकाऊपणा.

मी वनस्पती शास्त्र विषयात विद्यावाचस्पती घेताना सातपुड्यातील वाण, धान्य, वनस्पती आदींचा अभ्यास करताना ११ ज्वारी वाणांचे संकलन केले आहे. सीड बँकाही त्याद्वारे तयार करण्याचा प्रयत्न केला. आता मेघालयातील ज्वारी वाणाची या सीड बँकेत भर टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. पण हा वाण सातपुड्यातील दुर्गम भाग, सपाट भागातील काळ्या, मध्यम जमिनीत खरिपात कसे उत्पादन देतो, याचा संपूर्ण अभ्यास केला जाईल.
- डॉ. एच. एम. पाटील, वनस्पतिशास्त्रज्ञ तथा प्राचार्य, बामखेडा, ता. शहादा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT