Dairy farmer protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : सरकार अन् दूध उत्पादकांची बैठक निष्फळ, शासनाच्या परिपत्रकाची होळी

Milk Price Protest : राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नसंदर्भात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई झालेली बैठक निष्फळ ठरली

Swapnil Shinde

Drop Milk Procurement Price : दूध दर वाढीच्या संदर्भात राज्यभरात शेतकरी आक्रमक झाले असून राज्यभऱात आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मात्र, सरकारच्यावतीने सकारात्मक तोडगा निघू शकला नसल्याने ही बैठक निष्फळ झाली. बैठकीनंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे नेते अजित नवले यांच्यासह दूध उत्पादकांनी सरकारने काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

राज्याचे पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दूध संघ आणि उत्पादक शेतकरींची चार महिन्यांपूर्वी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत दुधाला किमान ३५ रुपये प्रति लिटर इतका दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका विखे-पाटील यांनी घेतली. तसे परिपत्रक काढण्यात आले. परंतु सध्या राज्यात अनेक खाजगी आणि सहकारी दूध संघांकडून सुमारे २७ रुपये प्रति लिटरने खरेदी केली जात आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीच आल्याने किसान सभा आणि रयत क्रांती संघटनेच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली.

या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली. यासाठी शासनाने हस्तक्षेप करून ३५ रुपयांपेक्षा कमी दराने दूधाची खरेदी करणाऱ्या दूध संघावर कारवाई करण्याची आग्रही भूमिका मांडण्यात आली. परंतु सकारात्मक तोडगा न निघाल्याने बैठकीनंतर माजी आमदार सदाभाऊ खोत, डाॅ. अजित नवले आणि दूध उत्पादकांच्या प्रतिनिधींनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर शासनाच्या परिपत्रकाची होळी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT