Agriculture Mechanization  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Mechanization : शेतीत यांत्रिकीकरणाचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करावा

Modern Agriculture : शेतीत उत्पादन खर्च वाढला असून यांत्रिकिकरणाच्या उपयोगाने उत्पादन खर्च कमी करावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी केले.

Team Agrowon

Akola News : शेतीत उत्पादन खर्च वाढला असून यांत्रिकिकरणाच्या उपयोगाने उत्पादन खर्च कमी करावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी केले. संत पुंडलिक महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित दहाव्या कृषी प्रदर्शनात आयोजित चर्चासत्रात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, की आता काळाची गरज म्हणून यांत्रिकीकरणाचा वापर करणे आवश्‍यक आहे. शासनाच्या यांत्रिकीकरणासाठी अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी आपली उन्नती साधावी.

यावेळी अभियंता निखिल जळमकर म्हणाले, की मूर्तिजापुरात निर्मित झालेले कापूस व इतर पिकांसाठी अतिघन लागवडीचे व अतिशय कमी पैशात तयार झालेल्या यंत्राची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतली.

कृषी चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून प्रयोगशील शेतकरी नंदू देशमुख व तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगती शेतकरी मंडळाचे अरुण बोंडे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत कृषी अभियंता पंकज खंडारे यांनी केले.

यावेळी विठ्ठल गोरे यांनीही शासकीय योजनांची माहिती दिली. आंतरभारतीचे प्रमोद राजनदेकर यांनी आभार मानले. चर्चासत्रात शेतकरी, विविध कृषी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित कृषी साहित्य संमेलन व कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT