Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : केंद्र सरकारकडून लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रणासाठी उपाययोजना; केंद्रीय दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाचा दावा

FMD Controlled : केंद्रीय दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाच्या सहसचिव सरिता चौहान यांनी दुभत्या जनावरांना होणाऱ्या आजारांवर केंद्र सरकारकडून पावले उचलत असल्याचे सांगितले. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशातील दूध उत्पादक दुभत्या जनावरांना होणाऱ्या लाळ्या खुरकूत रोगामुळे त्रस्त झाला आहे. लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण करण्यासह रोगाच्या पूर्ण उच्चाटनासाठी केंद्रीय दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाने काम सुरू केल्याचे सहसचिव सरिता चौहान यांनी सांगितले. यासाठी त्रिसूत्रीवर काम करणे आवश्यक असून यात जनावरांची हालचाल, रोगावर लक्ष आणि जैवसुरक्षा यांचा समावेश आहे. या त्रिसूत्रीवर काम केल्यास दूध उत्पादन आणि वापर दोन्ही वाढेल. यासाठी देशातील नऊ राज्यांची निवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय दुग्ध व पशुसंवर्धन मंत्रालयात झालेल्या बैठकीत सरिता चौहान यांनी दिली. या बेठकीत लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण योजनेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला एनआयएफएमडीचे संचालक डॉ. आर.पी. सिंगही उपस्थित होते.

मंत्रालयाने निवड केलेल्या देशातील पहिल्या लाळ्या खुरकूत रोग मुक्त झोनसाठी नऊ राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. या नऊ राज्यांमध्ये लाळ्या खुरकूत रोग नियंत्रित करण्याचे काम वेगाने सुरू असून येथे एफएमडीचा कोणताही प्रभावी हल्ला नाही. येथे एफएमडी लसीकरण कार्यक्रम येथे वेगाने सुरू आहे. येथे बायो सिक्युरिटीवर काम केले जात असल्यानेच या राज्यांची निवडण केल्याचे स्पष्टीकरण पशुसंवर्धन आयुक्त अभिजीत मित्रा यांनी दिले आहे. 

एफएमडीबाबत लाळ्या खुरकूत रोग मुक्त झोन तयार करून दुग्ध निर्यातीला चालना दिली जाईल. यासाठी देशातील नऊ राज्यांच्या सहकार्याने काम केले जाणार आहे. यासाठी काही मुद्देही तयार करण्यात आले असून ज्याचे पालन केले जाईल, असे सचिव अलका उपाध्याय यांनी सांगितले आहे. तसेच प्राणी तज्ज्ञांच्या मते, सध्या एफएमडीमुळे मांस विक्रीवर आलेल्या अडचणीही दूर होण्यास मदत होईल. तर मांस निर्यातीवरही सकारात्मक परिणाम दिसून येतील असे अलका उपाध्याय यांनी म्हटले आहे. 

कसा असेल कंपार्टमेंट झोन 

मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्याच्या मते, मंत्रालय कुक्कुटपालनाप्रमाणेच लाळ्या खुरकूत रोग मुक्त झोन तयार करण्याचे काम करेल. प्रत्येक झोनमध्ये जनावरांची तपासणी केल्यानंतर पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी एफएमडी आजार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले जाईल. जे मंत्रालय जागतिक आरोग्य संघटनेकडे (WHO) पाठवेल. यानंतर योग्य तपासणी केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना त्यावरून शिक्कामोर्तब करेल. यानंतर, एफएमडी रोग मुक्त कंपार्टमेंट झोनमध्ये येणारे राज्यातील किंवा शहरातील पशुपालक त्यांचे दूध निर्यातीसह दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या डेअरी प्लांटला विकू शकतील. त्यामुळे दुधाची मागणी वाढण्यासह दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादनही वाढेल असा दावा मंत्रालयाने केला आहे.

पोल्ट्री उद्योगासाठी २६ रोगमुक्त कंपार्टमेंट झोन

याआधी मंत्रालयाने अशाच प्रकारे देशातील विविध राज्यांमध्ये पोल्ट्री उद्योगासाठी २६ रोगमुक्त कंपार्टमेंट झोन तयार केले आहेत. त्यांना जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे येथील अंडी निर्यात करणे शक्य झाले असून निर्यातही वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT