Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : नंदुरबारमध्ये यंदा सर्वाधिक ऊस लागवड

Sugarcane Production : मागील तीन वर्षांत क्षेत्रात वाढ झाली. जळगाव जिल्ह्यात मागील हंगामातही १२ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. यंदाही १२ हजार हेक्टरवर जळगावात ऊस आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उसाखालील क्षेत्र स्थिर असून, नंदुरबार जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.खानदेशात सात साखर कारखाने सुरू आहेत. यामुळे गाळपासंबंधी अडचणी कमी असल्याने लागवडही स्थिर आहे.

मध्यंतरी खानदेशातील ऊस लागवड १५ हजार हेक्टरवर खाली आली होती. परंतु मागील तीन वर्षांत क्षेत्रात वाढ झाली. जळगाव जिल्ह्यात मागील हंगामातही १२ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. यंदाही १२ हजार हेक्टरवर जळगावात ऊस आहे.

धुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर ऊस आहे. यात साक्री व शिरपूर तालुक्यात ऊसलागवड अधिक आहे. नंदुरबारात १३ हजार हेक्टरवर ऊस असून, शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यात ऊस पीक अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने सुरू आहेत. यातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखाना जोमात सुरू आहे.

या कारखान्याने यंदा काही महिन्यांत पाच लाख टनांवर ऊस गाळप केले आहे. खानदेशात सर्वाधिक ऊस गाळप या कारखान्याने केले. जळगाव जिल्ह्यात चार साखर कारखाने सुरू आहेत. त्यात जिल्ह्याच्या चारही दिशांना किंवा भागात हे कारखाने काम करीत आहेत.

घोडसगाव (ता. मुक्ताईनगर), न्हावी (ता. यावल), चहार्डी (ता. चोपडा) व भोरस (ता. चाळीसगाव) येथे हे कारखाने सुरू आहेत. नंदुरबारात डोकारे (ता. नवापूर), समशेरपूर (ता. नंदुरबार), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथे कारखाने सुरू आहेत. तसेच तळोदा तालुक्यात एक खांडसरी सुरू आहे. यंदा मार्चअखेर खानदेशात १०० टक्के उसाचे गाळप होईल, असे चित्र आहे.

यामुळे ऊसलागवड स्थिर आहे. काही भागात ऊसलागवड कमी झाली आहे. परंतु काही भागात ऊसलागवड वाढली आहे. यामुळे क्षेत्र स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव भागात ऊसलागवड किंचित वाढली आहे. यावल भागातही ऊसलागवड किंचित वाढल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT