Mathadi Kamgar Agrowon
ॲग्रो विशेष

Mathadi Labor : माथाडी कामगार निवडणुकीवर बहिष्काराच्या मनःस्थितीत

Lok Sabha Election : बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱ्या माथाडी, मापारी कामगारांच्या हमाली व तोलाईची मजुरी व्यापारी व अडत्यांनी पूर्वप्रथेनुसार शेतकऱ्यांच्या हिशेब पट्टीतून कापून देण्यास विरोध दर्शविल्यामुळे बाजार आवारातील व्यवहार ठप्प आहेत.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारातील माथाडी व मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराईची मजुरी पूर्वप्रचलित पद्धतीने होणारी कपात करावी, त्यासंदर्भात संबंधित सरकारी यंत्रणेने तातडीने कार्यवाही न केल्यास हमाल व मापारी कामगार नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या मतदानावर माथाडी मंडळाचे सुमारे ५००० कामगार व त्यांचे कुटुंबीय बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत असून कामगार दिनापर्यंत न्याय मिळण्याची अपेक्षा माथाडी व मापारी कामगारांनी व्यक्त केली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे, कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी, आडते, खरेदीदार शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी आणि माथाडी व मापारी कामगारांनी पूर्वप्रचलित पद्धतीने कामकाज करावे,

आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकारकडे सर्व संबंधित घटकांच्या प्रश्नासंबंधीचे म्हणणे मांडून धोरणात्मक निर्णय घेण्यास सहकार्य केले जाईल, अशा सूचना नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या. जिल्हा उपनिबंधकांनीही अनेक वेळा संयुक्त बैठका घेऊन संबंधितांना सूचना केल्या. तरीही व्यापाऱ्यांनी कपातीस नकार दिला आहे. त्यामुळे गुंता वाढला आहे.

व्यापारी, अडत्यांनी पूर्वप्रथेनुसार करावी अंमलबजावणी

जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱ्या माथाडी, मापारी कामगारांच्या हमाली व तोलाईची मजुरी व्यापारी व अडत्यांनी पूर्वप्रथेनुसार शेतकऱ्यांच्या हिशेब पट्टीतून कापून देण्यास विरोध दर्शविल्यामुळे बाजार आवारातील व्यवहार ठप्प आहेत.

शेतकऱ्यांचे व माथाडी कामगारांचे नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी व अडत्यांनी पूर्वप्रथेनुसार अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन व कामगारांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा

Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

Solid Waste Management: घनकचरा व्यवस्थापनासाठी पिंपळगाव बसवंतला सव्वासात कोटी

Rural Water Crisis: महाड तालुक्यात गावे तहानलेली

Shaktipeeth Highway Protest: खाकी वर्दीची दडपशाही खपवून घेणार नाही, शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संतप्त, विटा 'तहसील'वर आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT