Ganesh Naik Agrowon
ॲग्रो विशेष

Development Fund : विकासकामांसाठी भरीव निधी देणार; पालकमंत्री नाईक

Wadhavan Port : वाढवण बंदराशेजारील वन विभागाच्या ५०० एकरच्या जागेसाठी अनेक उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

Team Agrowon

Palghar News : जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गरज पडल्यास सामाजिक दायित्व फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शिक्षकांच्या भरतीसाठी शिक्षणमंत्र्यांशी बोलणे सुरू असून, त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे.

काही दिवसांत तो प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. पालघर नियोजन भवनमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवारी (ता. ५) आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या कामाविषयी बऱ्याच तक्रारी आहेत. या मार्गाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. त्यासंदर्भात मंत्रालयात संबंधित विभागांची बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सीएसआरमधून विकास

वाढवण बंदराशेजारील वन विभागाच्या ५०० एकरच्या जागेसाठी अनेक उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आगामी काळात ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, सीएसआरमधून विकास होऊ शकेल, असेही मंत्र्यांनी सांगितले.

रिक्त पदे भरण्याचे आश्‍वासन

जिल्ह्याच्या विकासासाठी अर्थमंत्री अजित पवार यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव करून कामांसाठी वाढीव निधीसाठी प्रयत्न करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासामध्ये भेदभाव करण्यात येणार नाही. शैक्षणिक सुविधाचा स्तर उंचावण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, शौचालये, तसेच तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येतील.

आरोग्य विभागात सोनोग्राफी टेक्निशियन, शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा झाली आहे.आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा याविषयीचा अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे याआधीच बोलून मागणी केली आहे. जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT