Eggs in Midday Meal Agrowon
ॲग्रो विशेष

Eggs In Midday Meal : शालेय विद्यार्थ्यांना अंडी देण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा

School Midday Meal : राज्य शासनाने शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी सारख्या मांसजन्य पदार्थांचा समावेश केला असून त्याची अंमलबजावणी लवकरच होत आहे.

Team Agrowon

Akola News : राज्य शासनाने शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी सारख्या मांसजन्य पदार्थांचा समावेश केला असून त्याची अंमलबजावणी लवकरच होत आहे. या संदर्भात शासनाने परिपत्रकसुद्धा निगर्मित केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील शाकाहारी समाजात चिंता उत्पन्न झाली अजून पिढी ही मांसाहारी होते काय हा प्रश्न आता निर्माण झाला.

शासनाने हा चुकीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाचे अध्यक्ष सुभाष जैन यांनी केली आहे. या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी (ता. १४) येथे मोर्चा आयोजित केल्याचीही माहिती देण्यात आली.

आदर्श गोसेवा प्रकल्प कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला परमहंस विजयजी म सा, आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पचे माजी अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता उपस्थित होते.

मांसाहाराची पिढी निर्माण करण्याचा कट सध्या सर्वत्र सुरू आहे. त्याला राज्य सरकारचा दुजोरा मिळाला असून निर्णय शाकाहारी समाजासाठी अन्यायकारक असून निषेधार्य आहे.

निर्णय रद्दची मागणी

या संदर्भात अकोला महानगरातील संस्कृती रक्षा मंचाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. तसेच आदर्श गोसेवा प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना शालेय पोषण आहारामधून अंडी देण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.

या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी रामनगर परिसरातील आदर्श गोसेवा प्रकल्प कार्यालयात निषेध सभाही झाली. या सभेत विविध संघटना व समाज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या अंडी पुरविण्याच्या निर्णयाचा निषेध करीत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली असून संस्कृती रक्षा मंच व सर्व संस्थांच्या वतीने गुरुवारी स्थानिक जुन्या भाजी बाजार येथील जैन मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT