Amit Shah Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Development : मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करा

Development Fund : देश स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा तब्बल एक वर्षांनंतर स्वतंत्र झाला. त्यामुळे मराठवाड्याचा विकास आजपर्यंत म्हणावा तसा झाला नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ नंतरही मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात आलेला नाही.

Team Agrowon

Nanded News : राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी मराठवाड्यातील विविध विकास प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांच्याशी चर्चा केली. मराठवाड्यातील पाणी पुरवठ्यासह मूलभूत सोयी सुविधांच्या अनुषंगाने मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधीची विशेष तरतूद करावी, अशी मागणी खासदार गोपछडे यांनी केली.

देश स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा तब्बल एक वर्षांनंतर स्वतंत्र झाला. त्यामुळे मराठवाड्याचा विकास आजपर्यंत म्हणावा तसा झाला नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ नंतरही मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात आलेला नाही.

मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, कृषी सिंचनाचा प्रश्न, रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यासह अनेक प्रश्न आजही जसेच्या तसे आहेत. मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो.

मराठवाड्याला लागलेला दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी हा कलंक पुसून काढण्यासाठी मराठवाड्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.

वॉटरग्रीडचा प्रकल्प त्वरित सुरू करून तो पूर्णत्वास न्यावा. कृषी सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाणी वाटपाचा न्यायिक प्रश्न मार्गी लावावा. बायोगॅस योजना प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

शेतकरी व संबंधित योजनेला अनुदान देण्यात यावे व मराठवाडा विकास सिंचन, शिक्षण, कृषी, आरोग्य, रेल्वे, रोजगार, विमान उडान योजना, वीजनिर्मिती प्रकल्प, नांदेडमध्ये सोयाबीन इंडस्ट्री उद्योग सुरू करण्यासाठी व नांदेड येथून मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही केल्याचे गोपछडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT