CM Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

River Linking Project : मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास नेणार : मुख्यमंत्री शिंदे

CM Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार आहे.

Team Agrowon

Hingoli News : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार आहे. एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता. १२) व्यक्त केला.

हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयाधू अमृतधारा महादेव मंदिर आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्‍या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे, परंतु उर्वरित कालावधीतही मुबलक पाऊस पडावा, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी औंढा नागनाथ येथील श्री. नागनाथाला साकडे घातले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आनंदाचा शिधा, मुलींसाठी १०० टक्के मोफत उच्च शिक्षण आदी योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे, या योजनांचा लाभ घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT