Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Crisis : सिनाकोळेगाव २१ टक्क्यांवर; ‘विष्णुपुरीत’त ३४ टक्के पाणी

Water Scarcity : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ४६ टक्क्यांवर आला आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinbagar News : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ४६ टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये माजलगाव व सिनाकोळेगव प्रकल्पात सर्वात कमी २१ टक्के तर विष्णुपुरी प्रकल्पात ३४ टक्केच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

मराठवाड्यातील बहुतांश भागात गत पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी साठ्यातही बऱ्यापैकी पाणी साठले होते. असे असताना अनेक भागात आताच्या घडीला पाणीसाठे झपाट्याने आटत चालले आहेत. बदनापूर व जालना तालुक्यातील काही भागात तर अक्षरशः टँकरने फळपिकांना पाणी घालून ते वाचविण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.

याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी टँकर शिवाय पर्याय नसल्याची ही स्थिती आहे. शहरी भागातील बोरवेल्स मोठ्या प्रमाणात आटल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा ४३ टक्क्यांवर आला आहे.

येलदरीत ५७ टक्के, सिद्धेश्वर मध्ये ५१ टक्के, मांजरामध्ये ३७ टक्के , ऊर्ध्व पैनगंगा मध्ये ५३ टक्के, निम्न तेरणामध्ये ५८ टक्के,निम्न मनारमध्ये ४७ टक्के, विष्णुपुरीत ३४ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पात ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

वाढू शकते बाष्पीभवनाचा वेग

जलसंपदा विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार आताच्या घडीला जायकवाडी प्रकल्पातून दर दिवशी दोन दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते आहे. उन्हाची तीव्रता अशीच वाढत राहिल्यास बाष्पीभवनाचा वेग ही त्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकीकडे बाष्पीभवन व दुसरीकडे पाण्याची वाढलेली गरज यामुळे जायकवाडीतील तसेच इतरही प्रकल्पातील पाणीसाठा त्यांच्या बाष्पीभवनाच्या वेगानुसार झपाट्याने खाली जातो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Smart Farming: स्मार्ट शेती : गरज, तंत्रज्ञान आणि भविष्य

Bhusar Market Closure: मार्केट यार्डातील भुसार बाजार २५ फेब्रुवारीला राहणार बंद

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

SCROLL FOR NEXT