Maratha Andolan Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : आंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यात बंद, रस्तारोको आंदोलन

Maratha Reservation Protest : आंतरवाली सराटी (जि.जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.चार) परभणी जिल्हयात दोन ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

माणिक रासवे

Maratha Andolan in Maharashtra : आंतरवाली सराटी (जि.जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.चार) परभणी जिल्हयात दोन ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. तर गंगाखेड शहरासह पोखर्णी नृसिंह गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

परभणी जिल्ह्यात आंतरवाली सराटी (जि.जालना) येथील घटनेचे पडसाद उमटत आहेत. सोमवारी (ता.४) जिल्ह्यात विविध ठिकाणी निरनिराळे आंदोलने करण्यात आली. गंगाखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या ठिकाणी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येवून तहसिलदारांना घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले.

येथील चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. पोखर्णी नृसिंह (ता.परभणी) या गावात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. पोखर्णी फाट्यावर सकाळी १० वाजता जोरदार रस्तारोको करण्यात आला.

या रस्तारोको आंदोलनात पोखर्णीसह आजू -बाजूच्या गावातील मराठा समाजातील लोक सहभागी झाले होते. हा रस्तारोको दीड ते दोन तास चालला. पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांनी आंदोलकांची भेट घेवून निवेदन स्विकारले. दरम्यान, जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परभणी आगारासह इतर आगारातून बससेवा बंद ठेवण्यात आली होती. एकाही आगारातून सोमवारी बस गाडी धावल्या नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT