Maratha Reservation Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : जळगावात मराठा, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण ६५ टक्के पूर्ण

Maratha Reservation Survey Update : जळगाव जिल्ह्यातील पाच लाखांवर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले, त्याची एकूण कुटुंबाच्या संख्येशी टक्केवारी ६५ टक्क्यांवर आहे.

Team Agrowon

Jalgaon News : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शनिवारी (ता. २७) सर्व मागण्या मान्य केल्यानंतरही प्रशासनाने सुरू केलेले मराठा व अन्य संबंधित वर्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. जिल्ह्यातील पाच लाखांवर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले, त्याची एकूण कुटुंबाच्या संख्येशी टक्केवारी ६५ टक्क्यांवर आहे.

काही दिवसांपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात हालचाली गतिमान झाल्या होत्या. मनोज जरांगे-पाटलांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या आंदोलनानंतर कुणब्यांच्या नोंदी शोधण्याची मोहीम राज्यभर सुरू झाली. जळगाव जिल्ह्यातही अशा लाखावर नोंदी मिळून आल्यात.

त्यानंतरच्या टप्प्यातही आंदोलन शांत झाले नाही व जरांगेंनी मुंबईत आंदोलनाचा हुंकार दिला. त्यानुसार त्यांनी आंतरवाली सराटीतून काढलेला पायी मोर्चा मुंबईत धडकण्याच्या पार्श्‍वभूमीवर जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या. आठवड्यापूर्वी सरकारने आदेश काढत जिल्हानिहाय मराठा व अन्य समाजाच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली. त्यानुसार गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सर्वेक्षणाबाबत सूचना दिल्या. त्याअंतर्गत प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती केली.

प्रगणकांना येताहेत अडचणी

या सर्वेक्षणाबाबत जिल्हा प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती केली असली तरी अद्याप बहुतांश नागरिकांना अशा प्रकारचे सर्वेक्षण सुरू झाले आहे, याची माहिती नाही. त्यामुळे प्रगणकांना व सर्वेक्षणात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

प्रत्येक घरी गेल्यानंतर संबंधित कुटुंबातील सदस्यांकडून वेगवेगळे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. काही जण सहकार्य करीत नसल्याचीही कर्मचाऱ्यांची भावना आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात धीम्या गतीने हे काम सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या कुटुंबांच्या सर्वेक्षणाची टक्केवारी अवघी २२.७२ आहे. पालिका क्षेत्रातील सर्वेक्षण करावयाच्या कुटुंबांची संख्या एक लाख ५७ हजार ६५० असताना आतापर्यंत केवळ ३५ हजार ८२२ कुटुंबांचेच सर्वेक्षण होऊ शकले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT