Solar Energy Agrowon
ॲग्रो विशेष

Saurgram : मान्याचीवाडी होणार पहिले ‘सौरग्राम’

Team Agrowon

Satara News : पाटण तालुक्यातील आदर्श गाव असलेले ‘मान्याचीवाडी’ आता लवकरच सौरग्राम म्हणून ओळखले जाणार आहे. मंगळवारी (ता. २५) महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत मान्याचीवाडीने पंतप्रधान सूर्यघर- मोफत वीज योजनेचा लाभ घेत सर्व घरांच्या छतावर सौरऊर्जा संच बसवून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आहे.

स्वच्छ व सुंदर असलेले मान्याचीवाडी हे एक आदर्श गाव म्हणून ओळखले जात असून, या गावाने अनेक लोकोपयोगी, पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात कायम आघाडी ठेवली आहे. यापूर्वी मान्याचीवाडीने ‘गो-ग्रीन’ योजनेचा लाभ घेतला आहे. या गावात छापील वीजबिल आता कालबाह्य झाले असून, सर्वांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर वीजबिले मिळतात, तसेच ही बिले ऑनलाइन भरण्यावरच भर असतो. त्यासाठी बिलामागे दहा रुपयांची सूट मिळत आहे.

ग्रामसभेत मुख्य अभियंता पावडे यांनी अपारंपरिक ऊर्जेचे व सूर्यघर योजनेचे महत्त्व आणि त्याकरिता केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ७८ हजार रुपयांच्या अनुदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर गावातील १०२ वीज ग्राहकांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नावनोंदणी केली.

ग्रामसभेला सूर्यघर योजनेत काम करणाऱ्या ठेकेदारांनीही सहभाग नोंदवला. ग्रामसभेला सरपंच रवींद्र माने, प्रभारी अधीक्षक अभियंता अमित बारटक्के, कऱ्हाडचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले, उपकार्यकारी अभियंता चेतन कुंभार, अमित आदमाने, सहायक अभियंता अमोल देसाई, धनंजय शेडे, कनिष्ठ अभियंता सागर यादव, वीज कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मान्याचीवाडी हे खरोखरच एक आदर्श गाव असून, येथील नागरिक पर्यावरणपूरक उपक्रमात आघाडी घेतात. सूर्यघर योजनेत त्यांनी नोंदवलेला सहभाग कौतुकास्पद असून, लवकरच या गावाला ‘सौरग्राम’ म्हणून नवी ओळख मिळेल.
सुनील पावडे, मुख्य अभियंता, महावितरण बारामती परिमंडल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT