PM Kisan Fraud Link AGROWON
ॲग्रो विशेष

PM Kisan Fraud Link : पीएम किसानच्या बनावट लिंकद्वारे अनेकांची लूट; नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार

PM Kisan Scheme Link : मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झाले आहेत.

sandeep Shirguppe

Fake PM Kisan Links : नाशिक जिल्ह्यात पीएम किसानच्या बनावट लिंकच्या माध्यमातून अनेकांची फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नाशिक पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. तर कसुन चौकशीही सुरू केली आहे. अशा प्रकारची फसवणुक होऊ नये यासाठी अनोळखी नंबरवरून आलेली कुठलीही लिंक उघडू नका. या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जागरुक राहावं, आणि काही शंका आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याचाच फायदा घेत गुन्हगारांनी अनेकांची फसवणुक केली. मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झाले आहेत. या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे लुटत आहेत. एका शेतकऱ्याच्या अकाऊंटमधून तब्बल २ लाख रुपये गायब झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

कशी होते सायबर लूट ?

मोबाईलवर पीएम किसान योजनेची फेक लिंक येते. बँक खात्याशी सलग्न मोबाईल फोन हॅक करून शेतकऱ्याची फसवणूक होते. एपीके फाईलच्या माध्यमातून ही लिंक येते यातून फसवणूक होते. मोबाईलवर आलेली APK फाईल डाऊनलोड करताच विशिष्ट प्रोगाम अॅक्टिव्ह होतो. यामध्ये हॅकरला बँक खात्याचे ओटीपी मिळतात. टप्प्याटप्प्याने बँक खात्यातील रक्कम काढून घेण्यात येते.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉटस् ॲप खाते हॅक

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉटस् ॲप खाते हॅक करण्यात आले. यातून काही शेतकऱ्यांचे पैसेही कट झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सिन्नर येथील कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयातून दुजोरा देण्यात आला आहे. खाते हॅक झाल्याबाबत कृषीमंत्री कोकाटे यांनी स्वत: याबाबत कोणत्याही मेसेजला प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांकडूनही याबाबत सोशल मिडियावर आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही संपर्क यंत्रणांवरुन हॅकर्सबाबत सातत्याने आवाहन केले जात आहे.

पीएम किसानचा हप्ता २४ फेब्रुवारीला

राज्यातील अंदाजे ९२ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारीअखेर मिळणार आहे. ‘पीएम किसान’मध्ये वार्षिक ६ हजार रुपयांची मदत ४ महिन्यांच्या टप्प्याने ३ हप्त्यांमध्ये वाटली जाते. वेळापत्रकानुसार या योजनेतील १९ वा हप्ता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ असा आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार आहे. तेथेच १९ व्या हप्त्याचे वाटप होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयात त्याबाबत नियोजन चालू असल्याचे कृषी आयुक्तालयाने माहिती देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT