Ramesh Bais Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय क्षेत्रात अनेक संधी

Ramesh Bais : राज्यपाल बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा (माफसू) ११ वा दीक्षान्त समारोह संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते.

Team Agrowon

Nagpur News : आगामी काळात पशुपालन, मत्स्य शेती व दुग्ध व्यवसाय हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक होणार असून या क्षेत्रात गुंतवणूक, उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपाल बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा (माफसू) ११ वा दीक्षान्त समारोह संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालनाची भूमिका महत्त्वाची आहे असे सांगून पशुविज्ञान विद्यापीठातील स्नातकांकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची तसेच रोजगार निर्मिती करून सामान्य नागरिकांना उपजीविका उपलब्ध करून देण्याचे सामर्थ्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

या क्षेत्रातील स्नातकांनी पशुपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन या क्षेत्रात लाभदायक उद्योग सुरू करावेत, असे आवाहन राज्यपालांनी केले. विद्यापीठातील प्राध्यापक-स्नातकांनी २०२२ या वर्षी लम्पी त्वचा रोगाच्या निर्मूलनाचे कार्य करताना अनेक प्राण्यांचे जीव वाचवले तसेच स्वदेशी गायींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

दोन महिन्यांपूर्वी आपण गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती याचे स्मरण करत मनुष्य व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या दीक्षांत भाषणात मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अनिल कुमार श्रीवास्तव यांनी दुग्ध उत्पादन क्षेत्रातील श्वेत क्रांतीचा प्रभाव व सकल मूल्य हरित क्रांतीपेक्षा अधिक होते, असे सांगितले.

अन्नधान्य उत्पादनात देश आत्मनिर्भर असला तरीही देशात कुपोषण आढळते असे सांगून पोषण सुरक्षेची समस्या दूध, अंडी, मासे व मांस यांच्या माध्यमातून सोडविता येऊ शकते असे त्यांनी सांगितले. वातावरणातील टोकाच्या बदलांचा मोठा परिणाम कृषी व अन्नधान्य उत्पादनावर होईल, असे सांगून राज्यात तसेच देशात पशुसंवर्धन व मत्स्यपालन उद्योगाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षान्त समारोहात १७९० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, ९५ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके देण्यात आली तर तीन स्नातक विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी विद्यापीठ अहवाल सादर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT