Palghar Nwes : डहाणू तालुक्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी बांधावर तूर लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे भातपिकाचे नुकसान झाल्यानंतर तूर लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
तूर हे पोषक घटकांनी युक्त पीक आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी ती उपयोगी ठरते. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकरी तूर, कडू वाल, उडीद, हरभरा अशा पिकांची आंतरपीक लागवड करू लागले आहेत.
यामुळे भातपिकाला पर्याय निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तुरीचे सध्या बाजारभाव अडीचशे ते साडेतीनशे रुपये किलोपर्यंत गेले आहेत. त्यामुळे घरच्या गरजेसाठी तुरीचा उपयोग होत आहे.
उरलेली तूर विक्री करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या लाभ मिळवत आहेत. या पिकांना किडींचा त्रास कमी असून, खतांची आवश्यकता कमी भासते. शेतकरी बांधावर तुरीची लागवड करून आंतरपीक घेत आहेत.
आम्ही भात हे मुख्य पीक घेतो; पण काही वर्षांपासून भाताला नीट बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे तूर, उडीद, हरभरासारखी पिके लागवड करून आम्हाला चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्या तूरडाळ महाग असल्याने घरच्या गरजेसाठी ती उपयोगी पडत आहे. तूर लागवड शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायदा देणारी ठरली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी आंतरपीक पद्धतीचा अंगीकार करत आहेत.- काशीराम खटाळ, शेतकरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.