Sugar Factories Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factories Kolhapur : साखर कारखान्यांच्या वजन काट्यात तफावत; कोल्हापूर जिल्ह्यात रॅकेट

Sugar Facotry Weight : वजनकाट्यांची काटेकोर तपासणी करून या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी केली.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Season : साखर कारखान्यातील नियमबाह्य काटे सर्रास वापरले जात आहेत. याची तपासणी नियमानुसार होत नाही. हेराफेरी करणारे हे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यमापन शास्त्र विभाग व साखर सहसंचालक कार्यालयास दिलेल्या निर्देशानुसार वजनकाट्यांची काटेकोर तपासणी करून या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी केली. याबाबतचे निवेदन सोमवारी (ता. १४) जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत वैधमापनचे उपनियंत्रक दत्तात्रय पवार, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांची बैठक झाली. त्यावेळी वैधमापन शास्त्र विभागाने दाखल केलेल्या खुलाशामध्ये साखर कारखान्याचे वजन काटे योग्य पद्धतीने तपासल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु यामध्ये गोंधळ असल्याचा आरोप पाटील यांनी केला. यावर तहसीलदार पवार म्हणाले की, याप्रकरणाची आम्ही दखल घेऊन ज्या साखर कारखान्यांमध्ये तफावत दिसून येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

२०२३-२४ च्या हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यातील वजन काट्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केल्याचे आदेश वैद्यमापन शास्त्रविभागाने सर्व निरीक्षकांना नुकतेच दिले.

एका बाजूला वजन काट्यांची तपासणी योग्य पद्धतीने केली असल्याचा निर्वाळा देण्यात येतो तर दुसरीकडे जिल्ह्यातील सात कारखान्याच्या वजन काट्याची पुनर्तपासणी करण्याचे मागणी मान्य करून निरीक्षकांना आदेश वैद्यमापन विभागाने दिले आहेत. यामुळे वैद्यमापनशास्त्र विभागाच्या कामातील निष्काळजीपणा दिसतो. जिल्ह्यातील अनेक प्रकारच्या वजन काट्यात फेरबदल केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राहुल पाटील, धन आमते, योगेश जगदाळे, पाटील, वैभव पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT