Manikrao Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Minister Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वीकारला कार्यभार

Manikrao Kokate News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी आठ दिवसांनंतर मंत्रालयात आपल्या कार्यालयात कार्यभार स्वीकारला.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : बियाणे, खते, विमा यांसाठी एक संयुक्त पोर्टल तयार केले जाईल. तसेच डीबीटी धोरण अधिक बळकट करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जातील याची दक्षता घेतली जाईल. ‘एक खिडकी’ योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी (ता.३०) दिली. कोकाटे यांनी सोमवारी आठ दिवसांनंतर मंत्रालयात आपल्या कार्यालयात कार्यभार स्वीकारला, त्यानंतर ते बोलत होते.

कोकाटे म्हणाले, ‘‘राज्यात लाडकी बहीण योजनेसारखे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कसे जातील यावर भर दिला जाईल. कृषी विभागाचा आढावा घेऊन आवश्यक तेथे बदल केले जातील. राज्यात पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत, त्याबाबत चौकशी करण्यात येईल.

कोणावरही आरोप करणे बरोबर नाही. पीकविमा घोटाळ्याची चौकशी करून जे तथ्य येईल ते समोर आणले जाईल. सध्या तरी नाण्याची एक बाजू तुम्ही पाहली आहे. दुसरी बाजू पडताळली पाहिजे.’’ ते पुढे म्हणाले, की कांदा दर, आयात निर्णय यांसारख्या बऱ्याच गोष्टी केंद्राच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे केंद्र सरकारशी समन्वय साधून काम करू.

‘अमावस्या, पौर्णिमा बघत नाही’

खातेवाटप होऊन आठ दिवसांनंतर कार्यभार घेतला नसल्याने मंत्र्यांवर टीका होत होती. अखेर सोमवारी अमावस्या असतानाही तुम्ही कार्यभार कसा घेतला असे पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, की शेतकऱ्याला जात, पक्ष आणि धर्म नसतो. अमावस्या, पौर्णिमा फक्त कॅलेंडरपुरते असतात. काम करतो त्याला मुहूर्त पाहायची गरज नसते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT