Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Sale : सांगलीतील महोत्सवात २२ लाखांच्या आंब्यांची विक्री

Mango Festival : कृषी विभाग सांगली व कृषी पणन मंडळामार्फत सांगलीत २४ ते २६ मे या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात २२ लाख रुपयांच्या आंब्यांची विक्री झाली.

Team Agrowon

Sangli News : कृषी विभाग सांगली व कृषी पणन मंडळामार्फत सांगलीत २४ ते २६ मे या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात २२ लाख रुपयांच्या आंब्यांची विक्री झाली. या महोत्सवात ९ हजार डझन आंबा विकला गेला, अशी माहिती कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री'' या संकल्पनेअंतर्गत सांगलीत २४ मेपासून तीन दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ३५ शेतकऱ्यांनी ४७ प्रकारच्या विविध जातींचे आंबे प्रदर्शनात ठेवले होते.

ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा व स्थानिक केशर आंबा उत्पादकांकडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. हापूसला दर ४००, तर केशरला २५० ते ३०० रुपये प्रति डझन दर मिळाला. या वेळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर व सांगली जिल्ह्यांतील ३५ शेतकऱ्यांनी ४७ प्रकारचे आंबे ठेवले होते.

यामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, स्थानिक केशर आंबा, या बरोबरच राजूमन, करुठा कोलंबन, हिमायुद्दीन, सुवर्णरखा, ब्लॅक कोलमन, तोतापुरी, कोंडूर गोवा, नाजुद पसंद, सन्नू-कल्ल, बिलाय कोलंबन, बनेशान, केसर, जहांगीर, काळा गंडरस आंबे प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. याचे संयोजन कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले व कृषी विभागाने केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT