Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Sunburn : उन्हाचा आंब्याला चटका

Mango Season : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या चटक्याने ऐन हंगामात आंबा धोक्यात आला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या चटक्याने ऐन हंगामात आंबा धोक्यात आला आहे. तापमानवाढीने फळगळीसह आंबा करपण्याचे प्रमाण वाढले आहे. जमिनीवर पडलेल्या फळांमुळे फळमाशींचा उपद्रवदेखील वाढू लागल्याने आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.

कोकणात गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढ सुरू आहे. परंतु आतापर्यंत दिवसा तापमान वाढ आणि रात्री गारवा राहात होता. सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत वातावरण थंड राहत होते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून कोकणात उष्णतेची लाट सुरू आहे.

सकाळी नऊ वाजता ३४ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद सध्या होत आहे. बुधवारी (ता. १७) दुपारी जिल्ह्यात उच्चांकी ३९ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेले आठ ते दहा दिवस सलग तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. उन्हाचा चटका वाढल्याचा मोठा परिणाम प्रमुख फळपीक असलेल्या आंब्याला बसत आहे.

ऐन हंगामात तापमानवाढीच्या संकटाने बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. झाडांवरील परिपक्व होण्याच्या स्थितीतील फळे करपत असून, फळगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या दोन, तीन दिवसांत फळगळीचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जमिनीवर पडलेली फळे आणि दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण यामुळे फळमाशींचा उपद्रवदेखील वाढला आहे.

त्यामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. आंबा पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दीड महिन्यापूर्वी फुलकिडीमुळे मोठे नुकसान झाले. त्यातून कसेबसे सावरलेल्या बागायतदारांपुढे कडक उन्ह आणि फळमाशीपासून आंबा संरक्षण करण्याचे आव्हान उभे आहे.

तापमानवाढीमुळे आंबा फळगळ वाढली आहे. ती रोखण्यासाठी प्रतिझाड १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. गळून पडलेल्या फळांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पडलेली सर्व फळे कीटकनाशकांच्या द्रावणात टाकावीत. किंवा सर्व फळे खड्ड्यात पुरावीत. याशिवाय हेक्टरी चार रक्षक सापळे बागेत लावावेत.
- डॉ. अजय मुंज, कीटकशास्त्रज्ञ, आंबा संशोधन उपक्रेंद्र, रामेश्‍वर, ता. देवगड
उन्हामुळे आंबा करपत आहे. ढगाळ वातावरणामुळे फळमाशीचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या तीन-चार दिवसांत फळगळीचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्याचा विपरीत परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे.
- बाळा मुळम, आंबा बागायतदार, कलंबई, ता. देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT