Mango Production Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Production : आधुनिक तंत्रज्ञानातून आंबा उत्पादन वाढ शक्य

Agriculture Technology ; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा उत्पादन वाढ करणे शक्य, असल्याचा मत कार्यशाळेतील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

Team Agrowon

Dharashiv News : सहकार व पणन विभागांतर्गत आशिया विकास बँक अर्थसाह्यित लातूरच्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुण्याच्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, कृषी विभाग व आत्मा प्रकल्प तर गौर (ता. कळंब) येथील भैरवनाथ किसान कृषी प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने शुक्रवारी (ता. २३) सापनाई येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आंबा उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

आंबा उत्पादकता वाढ हा कार्यशाळेचा विषय होता. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा उत्पादन वाढ करणे शक्य, असल्याचा मत कार्यशाळेतील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‍घाटन झाले. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक खंडेराव सराफ, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, मॅग्नेटचे विभागीय प्रकल्प अधिकारी गणेश पाटील, विभागीय प्रकल्प अधिकारी हेमंत जगताप, सहकार विकास महामंडळाचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी भागवत सरडे, कळंबचे तालुका कृषी अधिकारी गजेंद्र नवघरे, मॅग्नेटचे कन्सल्टंट अक्षय हातागळे, कृषी व्यवसाय तज्ज्ञ पृथ्वीराज मणके, भैरवनाथ किसान कंपनीच्या संचालक मंडळाची प्रमुख उपस्थित होती.

श्री. माने यांनी जिल्ह्यामध्ये आंबा फळाचे क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने आंब्याची लागवड करण्याची गरज व्यक्त करून कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर व अन्य योजनांचा फळबाग लागवडीसाठी फायदा घ्यावा, असे आवाहन केले. श्री. सराफ यांनी आंबा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मॅंग्नेटवर ऑनलाइन नोंदणी करावी व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

श्री. जगताप यांनी मॅग्नेट प्रकल्प व त्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. श्री. पाटील यांनी मॅग्नेट प्रकल्प व सहकार पणन विभागाच्या योजना तसेच ग्लोबलगॅप प्रमाणीकरण व आंबा विक्री व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तसेच या एकदिवसीय प्रशिक्षणातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आंब्याचे उत्पादन वाढण्यासाठी करावा, असे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT