Mango Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Farming : आंबा उत्पादकांना लागली हंगामाची चाहूल

Mango Season : हापूस कलमांना पालवी येण्यास सुरुवात झाल्यामुळे आंबा बागायतदारांना यंदाच्या हंगामाची चाहूल लागली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : हापूस कलमांना पालवी येण्यास सुरुवात झाल्यामुळे आंबा बागायतदारांना यंदाच्या हंगामाची चाहूल लागली आहे. यंदा ७० टक्के कलमांना पहिल्या टप्प्यात नैसर्गिकरित्या पालवी येत राहील, असा अंदाज आहे. ज्या कलमांना पालवी येणार नाही, ती नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहोरतील. त्यासाठी थंडी आणि ऊन असे वातावरण आवश्यक आहे, असे बागायतदारांनी सांगितले.

गत वर्षी तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात झाडांना मोहोर आल्यामुळे शेवटच्या टप्प्यात उत्पादन चांगले मिळाले होते. त्यामुळे यंदा बहुसंख्य झाडांना पालवी येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरीस सलग चार दिवस पडलेल्या उनाच्या तापामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २० टक्के झाडांना पालवी दिसू लागली आहे.

समुद्रकिनारी, खाडीकिनारी परिसरात हे प्रमाण अधिक आहे. सध्या पाऊस पडत असल्यामुळे जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस झाडांना सतत पालवी येत राहील. तर, मोहोर बाहेर पडण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडेल. त्या काळात अति थंडीमुळे थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामुळे बागायतदारांना मोहोर वाचविण्यासाठी महागड्या औषधांचा वापर करावा लागतो. ती वापरूनही जेवढा मोहोर वाचेल, त्यातून किती उत्पादन मिळेल त्यावर बागायतदारांचे सर्वकाही अवलंबून राहणार आहे.

पालवी न आलेली झाडे किती टक्के असतील यावर पहिल्या टप्प्यातील उत्पादन अवलंबून राहणार आहे. अशा झाडांना नोव्हेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात होईल. त्यामधून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंबा उत्पादन हाती येईल. त्यादृष्टीने आंबा बागायतदार तयारी लागले आहेत. सध्या ठिकठिकाणी बागांची साफसफाई सुरू झाली आहे. पुढील पंधरा दिवसांनंतर हंगामाचे चित्र निश्चित होणार आहे

गत वर्षी मोहोर येणाऱ्या झाडांची संख्या अधिक होती. त्यामुळे यंदाचा हंगाम तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या पाऊस पडत आहे. पुढील आठ दिवसांत थंडीला सुरुवात झाली, तर त्याचा फायदा बागांना होईल. यंदाच्या हंगामाचे चित्र पुढील पंधरा दिवसांत निश्चित होईल.
राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT