Kolhapur Market Rate agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Market Rate : आंब्याचे दर आवाक्यात तर भाजीपाला दरात तेजी, काय आहे मार्केट स्थिती?

Shahu Market Yard : शाहू मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारपेठेत रोज सरासरी १५० गाड्या भाजीपाल्याची आवक होत आहे.

sandeep Shirguppe

Mango Rate : उन्हामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक घटल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील बाजारात २० टक्क्यांनी आवक घटली आहे. दरम्यान बाजारातील आवक कमी झाली असली तरी फळभाज्यांचे भाव नियंत्रणात आहेत, मात्र पालभाज्यांच्या दरात थोडी वाढ झाली.

घाऊक बाजारपेठेत साडेसात रुपयाला एक मिळणारी मेथीची पेंढी भाजी मंडईतील किरकोळ बाजारपेठेत १५ रुपयाला एक असा दर झाला. दरम्यान, हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरही काही अंशी कमी आले आहेत.

येथील शाहू मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारपेठेत रोज सरासरी १५० गाड्या भाजीपाल्याची आवक होत आहे. उन्हामुळे पन्नास गाड्या मालाची आवक घटली आहे. यात स्थानिक पातळीवर ७० ते ८० टक्के भाजीपाल्याचे सौदे होतात. उर्वरीत गाड्यातील माल कोकणात पाठवला जात आहे. उन्हामुळे फिरस्ती भाजीविक्रेत्यांकडून भाजीपाला कमी प्रमाणात खरेदी केला जात आहे.

त्यामुळे फिरस्त्या विक्रेत्यांकडून भाजीपाला कमी घेतला जात आहे. मंडईत बसणाऱ्या विक्रेत्यांकडून जास्त प्रमाणात भाजीपाला घेतला जात आहे. सायंकाळी भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी होत आहे. यात फळभाज्या नियमित भावात विकल्या जाताहेत, तर पालेभाज्या मात्र दुप्पट भावात विकल्या जात आहेत. उन्हामुळे पालेभाज्या खरेदी होऊन भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान होते म्हणून पालेभाज्यांचे भाव वाढल्याचे यासीन बागवान यांनी सांगितले.

उन्हाळ्यामुळे शीतपेय दुकानात तसेच स्टॉल्सवर फळांची मागणी आहे, तर घरगुती स्तरावरही पाणीदार फळांना मागणी जास्त आहे. यात मोसंबी, संत्रीची आवक व मागणीही जास्त आहे. दर दोन दिवसाला सरासरी १४ ते १८ टन फळांची आवक आहे. त्यामुळे भाव फारसे वाढलेले नाहीत. द्राक्षांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे.

ढगाळ वातावरणामुळे आवकेत वाढ

कोकणी हापूस आंब्याची आवक गेल्या दहा दिवसांत वाढली आहे. कोकणात ढगाळ वातावरण झाले. कोल्हापुरात पाऊस झाला, त्यामुळे भावही नियंत्रणात आले आहेत. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लावलेल्या स्टॉल्सवर थेट कोकणी हापूस दोनशे ते तीनशे रुपये बॉक्स, तर दीड हजार रुपयेला पाच डझनाची पेटी अशा दरातही विक्री होत आहेत. तर बाजार समितीत येणाऱ्या आंब्याचे भाव थोडे जास्त आहेत. दक्षिणेतूनही आंबा विक्रीस आला आहे. तो आंबा कोकणी हापूस आंब्याच्या तुलनेत स्वस्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Kumar Saptarshi Tribute: डॉ. सप्तर्षींचा विचार अखंडपणे जपणे गरजेचेच शरद पवार यांचे आवाहन

Drone Pilot Training MOU: ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ‘वनामकृवि’चा ‘सारथी’सोबत करार

Goat Deformity Case: गौंडगाव येथील बोकडामध्ये दिसली दुर्मीळ नैसर्गिक विकृती; पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञाकंडून तपासणी

Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे

Women Farmers Empowerment Council: राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन

SCROLL FOR NEXT