Mango Tree Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Crop Damage : आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत

Crop Damage Compensation : गतवर्षी अवकाळी पावसाने हजारो हेक्टर आंबा पिकाचे नुकसान झाले होते, मात्र विमा कंपन्यांकडून अजूनही काही बागायतदारांना परतावा न मिळाल्याने महाड तालुक्यातील ८०० बागायतदार भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Team Agrowon

Mahad News : बदलत्या वातावरणाचा फटका आंबा, काजू बागायतदारांना दरवर्षी बसतो. गतवर्षी अवकाळी पावसाने हजारो हेक्टर आंबा पिकाचे नुकसान झाले होते, मात्र विमा कंपन्यांकडून अजूनही काही बागायतदारांना परतावा न मिळाल्याने महाड तालुक्यातील ८०० बागायतदार भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. एका बाजूला लहरी हवामान तर दुसरीकडे कमी होणारे उत्पादन आणि वेळेत न मिळणारा परताव्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना केंद्र सरकारने जाहीर केली. त्यात अवेळी पाऊस, कमी-जास्‍त तापमान आणि गारपीटसाठी कालावधी जाहीर करण्यात आल्याने विमा कालावधी डिसेंबर ते मेपर्यंत होता.

रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते. आंब्याचे १४ हजार हेक्टर क्षेत्र असून उत्पादनक्षम क्षेत्र १२ हजार ५०० हेक्टर आहे.

भात शेतीखालोखाल फळबागांच्या उत्पादनाकडे पाहिले जाते. जिल्ह्यात वीस हजारांपेक्षा अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे म्हणून सरकारने प्रधानमंत्री फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. दरवर्षी हेक्टरी २९ हजार ४०० रुपये विम्याचा हप्ता शेतकऱ्यांकडून घेतला जातो.

गतवर्षी अवकाळी पावसासह बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले. सात हजार ८५० शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला तर सुमारे चार हजार हेक्टरपेक्षा अधिक आंबा पिकाचे नुकसान झाले.

महाड तालुक्यातील सुमारे २ हजार ४०० शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. त्यापैकी सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यात आली परंतु जे शेतकरी बाकी आहेत ते अद्याप भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT