Mango Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Festival : छत्रपती संभाजीनगरात आजपासून आंबा महोत्सव

Market Committee : छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता. २७) या महोत्सवाचे उद्‍घाटन होणार असून, (ता. ३१) मेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

आंबा महोत्सवाचे उद्‍घाटक म्हणून राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, रोजगार हमी फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाच्या उदेघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार हरिभाऊ बागडे आहेत.

या वेळी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था योगिराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर मुकेश बारहाते, तालुका उपनिबंधक डॉक्टर प्रवीण फडणीस, कृषी पणन मंडळाचे विभागीय उपसरव्यवस्थापक जी. सी. वाघ आदी उपस्थिती राहणार आहेत.

या महोत्सवात देवगड रत्नागिरी आदी भागांतील हापूस आंबा उत्पादक तसेच मराठवाड्यातील केसर आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. त्यामुळे दर्जेदार आंब्याची चव चाखन्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

या महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती मुरलीधर चौधरी व सचिव विजय शिरसाट यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT