Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Crop Insurance Scheme : : कोकणातील आंबा काजू फळबागातील शेतकऱ्यांची विमा रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने कृषी सचिव जयश्री भोज यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Team Agrowon

Mumbai News : कोकणातील आंबा काजू फळबागातील शेतकऱ्यांची विमा रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने कृषी सचिव जयश्री भोज यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

महाराष्ट्र शासन हवामानावर आधारित फळपीक विमा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबवित आहे. कोकणातील आंबा व काजू या फळपिकांचा या योजनेत समावेश आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी स्वहिस्सा विमा कंपनीकडे भरला आहे

२०२३-२४ च्या हंगामात सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमानातील वाढ या सारख्या आपत्तींमुळे सर्व जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी विमा परतावा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु जोखीम कालावधी संपून साडेतीन महिन्यांचा कालावधी संपला असताना देखील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला नाही. तरी ही विमा परताव्याची हक्काची रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली.

‘राज्य, केंद्र सरकारचा हिस्सा नाही’

राज्य शासनाकडून राज्याचा हिस्सा विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासन आपला हिस्सा विमा कंपनीला अदा करते. त्यानंतर तीन आठवड्यात विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा परतावा देते. परंतु राज्य आणि केंद्र शासनाने अद्याप आपला हिस्सा विमा कंपनीला अदा केला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना परतावा देण्यासाठी हालचाली कंपनीकडून अद्याप सुरू झालेल्या नाहीत. कोकणात जून ते ऑगस्ट या कालावधीत फळबागेच्या मशागतीचे काम केले जाते. किमान या कालावधीत तरी शेतकऱ्यांना पीकविमा मिळणे गरजेचे होते आता दसऱ्यापूर्वी तरी परतावा मिळाावा, अशी मागणी चंद्रकांत मोकल यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT