Farmers Hunger Strike  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Hunger Strike : मांडवडच्या शेतकऱ्यांचे नुकसान मदतप्रश्‍नी बेमुदत उपोषण

Latest Agriculture News : मांडवड व आझादनगर येथे मार्च व एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

Team Agrowon

Nashik News : मांडवड व आझादनगर येथे मार्च व एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही मदत न मिळाल्याने अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारपासून (ता. ३) मांडवड ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ उपोषण सुरू केले. लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.

तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार अतिवृष्टी आणि गारपीट होऊन सहा-सात महिने होऊनही मागणीची दखल घेतली गेलेली नाही, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र आम्हाला नेहमीच आठ दिवसांचा कालावधी देऊन वेळ मारून नेण्यात येत आहे.

त्यामुळे आम्हाला आता उपोषणाशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी भेटीसाठी आलेल्या तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, कृषी अधिकाऱ्यांना सांगितले. अनुदान मिळण्याच्या कार्यवाहीचे लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखविला.

विठ्ठल आहेर, सुशील आंबेकर, दत्तात्रय थेटे, बंडू थेटे, शरद काजळे, अण्णा दुलचंद आहेर, वाल्मीक थेटे, अशोक निकम, दीपक गडाख, बाबासाहेब आहेर, दीपक साळुंखे आदी शेतकरी उपोषणास बसले आहेत.

अनुदानाच्या प्रक्रियेसाठी कर्मचारी नेमणूक केली असून शेतकऱ्याचे आधार व्हेरिफिकेशन करायचे काम सुरू आहे. ते अपलोड करून झाल्यानंतर त्यांना मदत देता येईल.
- डॉ. सिद्धार्थ मोरे, तहसीलदार, नांदगाव
नुकसानीच्या मदतीपोटी ५०२ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. पण उर्वरित तीन कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून याद्या न टाकल्याने आम्हास अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.
- विठ्ठल आहेर, उपोषणकर्ते शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT