Wheat Management Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Management : गहू उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापन महत्त्वाचे

गव्हाच्या विविध संशोधित जातींची त्यांनी माहिती देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.

Team Agrowon

Akola News : तालुक्यात गहू पिकाची यंदा लागवड (Wheat Cultivation) वाढली आहे. गव्हाचे व्यवस्थापन (Wheat Management) करीत असताना लागवडीपासून ते ४०दिवसांपर्यंत गहू पीक ताणविरहित राहणे गरजेचे राहते.

उत्पादन वाढीसाठी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे राहते, असे मत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेशकुमार नेमाडे यांनी केले.

आत्माअंतर्गत अकोट तालुक्यातील जितापूर येथे शेतीशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा, आत्मा प्रकल्प संचालक आरिफ शाह, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात गहू लागवड व्यवस्थापन या विषयावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. कुलदीप देशमुख, कृषी सहाय्यक शिंगणे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. देशमुख यांनी गहू पिकाच्या संवेदनशील अवस्था, कांडी धरण्याची वेळ, फुलोरावस्था, दाणे भरण्याची वेळ, चीक अवस्था या सर्व टप्प्यात गहू पिकास पाण्याची पाळी देणे गरजेचे असल्याचे सांगितले

गव्हाच्या विविध संशोधित जातींची त्यांनी माहिती देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. कृषी सहाय्यक शिंगणे यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेतील विविध घटकांची माहिती दिली.

शेतीशाळेचे सूत्रसंचालन, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी यांनी केले. शेतीशाळेला गहू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT