Tembhu Irrigation Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Project : माण, खटावसह सांगोल्याला मिळणार एक टीएमसी पाणी

Water Update : एक टीएमसी पुराचे पाणी उचलण्याचे उद्दिष्ट असल्याचे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा.य. रेड्डीयार यांनी सांगितले.

Team Agrowon

Solapur News : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील माण, खटाव व सांगोला तालुक्यास कृष्णा नदीच्या पुराचे ०.५ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला असून, आणखी एक टीएमसी पुराचे पाणी उचलण्याचे उद्दिष्ट असल्याचे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा.य. रेड्डीयार यांनी सांगितले.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारित टप्पे व सातारा जिल्ह्यातील माण, खटाव व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला लाभक्षेत्रामध्ये उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या प्रगतीबाबत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या, कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेतली.

यावेळी प्रभाकर देशमुख, अभय जगताप, डॉ. बाबासाहेब देशमुख, अनिल देसाई व सुरेंद्र गुदगे यांचेसह माण खटाव व सांगोला मतदार संघातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत खासदार मोहिते पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगोला तालुक्यातील माण नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे.

तसेच टेंभू योजनेच्या आटपाडी डाव्या कालवामार्फत निंबवडे तलावाखालील बंदिस्त वितरिकेद्वारे लोटेवाडी खवासपूर व माण नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली. सद्यःस्थितीत पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीला पुराच्या पाण्यामुळे पातळी वाढलेली असल्याने योजना कार्यान्वित करून टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील माण, खटाव व सांगोला तालुक्यामध्ये पाणी सोडण्यात आल्याचे टेंभू प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी सांगितले.

गावांचे सर्वेक्षण करा

या बैठकीत टेंभू उपसा सिंचन योजनेच्या प्रगती बाबत आढावा घेत प्रवाही पद्धतीने ज्या गावांना पाण्याचा लाभ होणार आहे, परंतु सर्वेक्षणामध्ये समाविष्ट नसलेली गावे यांचे फेरसर्वेक्षण करावे, अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT