Malegaon Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Sugarcane Crushing : माळेगावच्या संचालक मंडळ व कामगारांनी आगामी हंगामात १४ ते १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Team Agrowon

Baramati News : यंदा विक्रमी पावसामुळे ऊस तोडणीला शिवारात वापसा नाही. परिणामी, माळेगावसह सर्वच साखर कारखान्यांना सुरू होण्यास एक महिन्याचा विलंब झाला. आगामी ऊस गळीत हंगाम खूपच आव्हानात्मक आहे. माळेगावच्या संचालक मंडळ व कामगारांनी आगामी हंगामात १४ ते १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हे उद्दिष्ट पूर्ण करताना सभासदांच्या उसाला गाळपात शंभर टक्के प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच गाळप उसाला एकरकमी एफआरपी देण्याचे धोरण प्रशासन अवलंबणार आहे, अशी माहिती अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी स्पष्ट केली. या निर्णयाचे स्वागत उपस्थितांनी टाळ्या वाजवून केले.

सन २०२४ -२०२५ च्या ऊस गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पार पडला. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप व सौ. शांताबाई जगताप या दांपत्याच्या हस्ते पार पडलेल्या या समारंभात सभासदांनी विविध मुद्दे उपस्थित केले. तोच धागा पकडत अध्यक्ष श्री. जगताप बोलत होते.

या वेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, मदनराव देवकाते, योगेश जगताप अनिल तावरे, तानाजी कोकरे, बन्शीलाल आटोळे, दत्तात्रेय येळे, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, संगीता कोकरे, आलका पोंदकुले, मंगेश जगताप, प्रताप आटोळे, निशीकांत निकम, विलास कोकरे, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी, माळेगावच्या प्रशासनाने गतवर्षी सभासदांच्या उसाला ३,६३६ इतका राज्यात प्रथम क्रमांकाचा दर दिला, दिवाळीला कामगारांना सर्वाधिक २५ टक्के बोनस दिला व मागील चार वर्षांत ऊस गाळप व उपपदार्थ निर्मितीमध्ये उच्चांक केल्याने अनेकांनी बोलताना संचालक मंडळाचे कौतुक केले. त्यामध्ये अशोक निवृत्ती तावरे, प्रकाश देवकाते, इंद्रसेन आटोळे, संतोष जाधव, ज्ञानदेव बुरुंगले, दशरथ राऊत, माजी कामगार संचालक सुरेश देवकाते, राजेंद्र देवकाते, शेखर जगताप यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT