Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Crop Survey : तासगाव तालुक्यात गेले चार-पाच दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तब्बल १५७ टक्के म्हणजे १७५ मिमी पाऊस नोंदविला गेला.

Team Agrowon

Sangli News : तासगाव तालुक्यातील सावळज, येळावी, वायफळे, तासगाव महसुली मंडलांत अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने या मंडलांतील ३२ गावांतील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिले.

तासगाव तालुक्यात गेले चार-पाच दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तब्बल १५७ टक्के म्हणजे १७५ मिमी पाऊस नोंदविला गेला. तर जून ते २५ सप्टेंबर दरम्यान तालुक्यात ८१७.२ मिमी पाऊस पडला. तो सरासरीच्या १९५ टक्के हे. तर २२ सप्टेंबर रोजी सावळज मडलामध्ये ७७.०८ मिमी, वायफळेत ७९.८, मिमी पाऊस झाला.

२३ रोजी येळावीत ७४.५, तासगावात ६७ मिमी पाऊस झाला. तर २४ रोजी सावळजला ७६ मिमी पाऊस पडला. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस एकाच दिवशी पडल्यास अतिवृष्टी मानली जाते. गेले चार महिने सतत तालुक्यात पाऊस पडत असून खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. भारी जमिनीतील मूग, उडीद, सोयाबीन अशी कडधान्ये कुजून गेली आहेत. तालुक्यात २२, २३ व २४ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली.

दरम्यान, तहसीलदार अतुल पाटोळे यांनी तासगाव, येळावी, सावळज, वायफळे महसुली मंडलांत अतिवृष्टी झाल्याने या महसुली मंडलांत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. या भागातील तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांना पंचनामे करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील तासगाव, वासुंबे, कवठेएकंद, नागावकवठे, मतकुणकी, कुमठे, चिंचणी, भैरववाडी, बेंद्री, शिरगाव, कवठे सावळज, सिद्धेवाडी, अंजनी वडगाव, नागेवाडी, लोकरेवाडी, डोंगरसोनी, वायफळे, बस्तवडे, यमगरवाडी, बिरणवाडी, जरंडी, दहिवडी, येळावी, जुळेवाडी, नागाकवठे, निमनी, नेहरूनगर, तुरची, राजापूर ढवळी, वंजारवाडी या ३२ गावांतील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT