Kharip Review Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Kharip Review Meeting : बी-बियाणे, खतांसाठी सूक्ष्म नियोजन करा

Kharip Management : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २२) खरीप हंगाम २०२४ पूर्व आढावा बैठक झाली.

Team Agrowon

Jalna News : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २२) खरीप हंगाम २०२४ पूर्व आढावा बैठक झाली. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व कृषी निविष्ठा खरीप हंगामात वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. शिंदे आदींसह कृषी विभाग, अग्रणी बँक, सहकार, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत २०२४ मधील खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनावर विस्तृत माहिती देण्यात आली. यामध्ये पर्जन्यमान, कापूस, सोयाबीन, आदी बी-बियाणे तसेच खते, कृषी निविष्ठा आदींचा साठा तसेच जिल्ह्याला लागणारा पुरवठा, पुरवठा करणाऱ्या कंपन्या तसेच बोगस खते, बियाण्यांवर करावयाची कारवाई याबाबत निर्देश देण्यात आले.

बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. महावितरण विभागाने सर्व शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे वीजजोडणी तत्काळ करून द्यावी. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड तसेच रेशीम लागवड करण्यासाठी कृषी विभागाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

६.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित

भारतीय हवामान खात्याने २०२४ मध्ये खरीप हंगामामध्ये सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. खरीप २०२४ करिता जालना जिल्ह्यामध्ये ६.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक खते व बियाणे उपलब्ध होणार आहे. जालना जिल्ह्यात ६९,६०२ क्विंटल इतके बियाणे उपलब्ध होणार असून कापूस बियाण्यांची १२.१७ लाख पाकिटे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बियाण्यांच्या तुटवडा भासणार नाही.

बोगस खते, बियाणे विक्रेत्यांवर होणार कारवाई

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे, खते वेळेमध्ये उपलब्ध होतील यांची कृषी विभागाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बोगस बियाणे, खते पुरवठा केल्यास कंपनी व विक्रेता यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जास्त दराने खते बियाणे विक्री केली तर संबंधित विक्रेते यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभागाची भरारी पथके तसेच तक्रार निवारण कक्ष यांनी दक्षतेने काम करावे.

बियाणे, खते जर मान्यताप्राप्त नसतील तर संबंधितावर गुन्हे दाखल करावेत यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने काम करावे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी याबाबत वेळेवेळी आढावा घ्यावा. जे अधिकारी काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त कृषी सेवा केंद्रांतूनच खते, बियाणे खरेदी करावे व मूळ पावती जपून ठेवावी यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT