Fodder Maize Cultivation Practises Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Cultivation : चंद्रपुरमधील मूल तालुक्‍यात २०० हेक्‍टरवर मका लागवड

शेतीपूरक दुग्ध व्यवसायावर मूल तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. नजीकच्या काळात या भागातील दूध संकलन ८५० लिटरवर पोहोचले असून चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी मका लागवडीसाठी पुढाकार घेत आहेत.

Team Agrowon

Chandrapur News : शेतीपूरक दुग्ध व्यवसायावर (dairy business) मूल तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. नजीकच्या काळात या भागातील दूध संकलन (Milk collection) ८५० लिटरवर पोहोचले असून चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी मका लागवडीसाठी (Maize Cultivation) पुढाकार घेत आहेत. त्यातूनच यंदा मक्‍याखालील क्षेत्र २०० हेक्‍टरवर पोहोचले आहे.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा देखील धान उत्पादनासाठी ओळखला जातो. त्याच्या जोडीला कपाशी, सोयाबीन यासारखे पीक घेतले जाते. पारंपरिक पिकांवर अवलंबिता असलेल्या या शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनातही सातत्य ठेवले आहे.

सरासरी ८५० लिटर इतके दूध संकलन उसराळा, सिंदी, डोंगरगाव या गावातून होते. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांद्वारे उन्हाळ्यात पाण्याअभावी चारा लागवड अत्यल्प होत होती.

बहूतांशवेळा बाजारातूनच चाऱ्याची खरेदी करावी लागत असल्याने त्यांच्यासाठी हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत होता. ही बाब लक्षात घेता मका लागवड व त्यापासून मुरघास निर्मितीला या भागात प्रोत्साहन दिले जात आहे.

कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षापर्यंत दहा हेक्‍टरपर्यंत असलेले मक्‍याचे क्षेत्र यंदा २०० हेक्‍टरपर्यंत विस्तारले आहे.

मक्‍यापासून मुरघास बनविले जात असून त्यासाठी खास प्लॅस्टिक पिशव्याचा पुरवठा आत्मा योजनेतून करण्यात आला आहे. मुरघास विषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याकरिता नगर जिल्ह्यातून खास चार प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पशुपालकांना उन्हाळ्यात चाऱ्याची अडचण निर्माण होते. परिणामी, मुरघास त्यांच्याकरिता सक्षम पर्याय ठरणार आहे. त्याच कारणामुळे तालुक्‍यात मका लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. त्यापासून मुरघास तयार करण्याचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना तज्ञांद्वारे देण्यात आले आहे.
भास्कर गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, मूल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT