Maize Composting Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Composting : मका खरच खादाड पीक आहे का?

मु. पो. गेवराई, जि. बिड येथील प्रगतीशील शेतकरी कृष्णराव काळे यांनी मका काडाचे शेतातच कंपोस्टिंग करुन जमिनीची सुपीकता वाढवली आहे.

Team Agrowon

गहू आणि तांदळानंतर मका पीक भारतातील तिसरे महत्त्वाचे पीक म्हणून पुढे येत आहे. पोल्ट्री क्षेत्रात (Poultry) मक्याला मोठया प्रमाणात मागणी आहे. मका (Maize) खादाड पीक असल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये खुप मोठ्या प्रमाणावर शोषण करते असे मानले जाते. वर्षभर ऊस (Sugarcane) जेवढे पोषक घटक जमिनीतून घेतो, त्याच्या ६० टक्के पोषक घटक ११० दिवसांतच मका पिकाला लागतात. दुसऱ्या बाजुला कणसे काढल्यानंतर उरलेले काड जनावरांना चारा म्हणून वापरले जाते किंवा जाळून टाकले जाते.  याशिवाय मका काढणी नंतर काडाची कापणी करुन पेंढ्या बांधून वाहतूक करण्यासाठी भरमसाठ खर्च येतो. यावर उपाय म्हणून मु. पो. गेवराई, जि. बिड येथील प्रगतीशील शेतकरी कृष्णराव काळे यांनी मका काडाचे शेतातच कंपोस्टिंग करुन जमिनीची सुपीकता वाढवली आहे.    

कृष्णराव काळे हे कृषी पदवीधर असल्यामुळे त्यांना शेतीचे तांत्रिक ज्ञान अवगत होते. त्यामुळे पदवी घेतल्यानंतर ते घरच्या शेतीत रमले. पिकावर वेगवेगळे प्रयोग करु लागले. कृष्णराव गेल्या २५ वर्षापासून मक्याचे पीक घेतात. त्यांची घरची २५ एकर शेती आहे. त्यातील १५ एकरावर मका पिक असते. मका पीक काढल्यानंतर जनावरांना चारा म्हणून दिल्यानंतर उरलेल्या काडाचे करायचे काय हा दरवर्षी त्याच्या समोर प्रश्न असायचा. यातून मका कंपोस्टिंग ही संकल्पना उदयास आली. 

मका कंपोस्टिंग म्हणजे काय?

मक्याची कणसे काढल्यानंतर उभ्या काडावर रोटर फिरवून काडाचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर दोन दिवसांत बारीक केलेल्या काडावर एका एकराच्या हिशेबाने एक क्विंटल सूपर फॉस्फेट, २५ किलो युरिया पसरला जातो.  पुढे, सवडीप्रमाणे दोन चार दिवसांत २ किलो कंपोस्ट कल्चर २०० लिटर पाण्यात मिसळून फवारले जाते. त्यावर वाढणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे कंपोस्टिंग वेगाने होते. पुढच्या पिकांसाठी ह्युमस तयार होण्याची प्रक्रिया वेग धरते. पुढच्या एक दोन दिवसांत दुसऱ्यांदा रोटर फिरवला जातो. त्यामुळे मक्याचे काड जमिनीत चांगल्याप्रकारे गाडले जाते. यानंतर घेतल्या जाणाऱ्या पिकाला दिलेल्या खतांमुळे काड कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. एका एकरातील मका काडाचे वजन सुमारे दहा टन भरते. या १० टन काडाचे कंपोस्टिंग केल्यामुळे दहा टन बायोमास जमिनीला परत मिळतो.

एकरी साधारपण ३० ते ३५  क्विंटल मका घेतल्यानंतर दहा टन काड आपण जमिनीला परत देतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता आपोआपच राखली जाते. मक्याच्या कणसातील दाणे काढल्यानंतर उरलेल्या कणसाच्या तुकड्यांचेही चांगल्या प्रकारे कंपोस्टिंग करता येते.  

शेणखतापेक्षा कमी खर्चीक 

शेणखत हे जमिनीची सुपिकता वाढवते हे अगदी खरे असले तरी शेणखताचा खर्च परवडत नाही. सध्या शेणखताची एक ट्रॉली १८०० ते २००० रुपयांना येते. शेणखत वाहतुकीचा आणि पसरवण्याचा खर्च धरुन प्रती ट्रॉली खर्च ३३०० रुपयांपर्यंत जातो. एकरी साधारणपने १५ ते १८ हजार खर्च होतो. हा खर्च सामान्य शेतकऱ्याला परवडत नाही. या एवजी मका उत्पादक शेतकऱ्यांनी जर मका काडाचे कंपोस्टिंग केले तर एकरी दीड ते दोन रुजार रुपये खर्च येतो. कारण मक्याची कणसे काढल्यानंतर रोयाव्हेटरने काड जागेवरच बारीक करुन जमिनीत गाडले जाते. त्यामुळे वाहतुकीचा आणि शेतात पसरविण्याचा खर्च वाचतो. कृष्णराव यांच्या अनुभवानूसार मका कंपोस्टिंगमुळे जमिनीची सुपिकता तर वाढलीच शिवाय जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढली, सुक्ष्मअन्नद्रव्यांना खाद्य उपलब्ध झाल्यामुळे पीकाची जोमदार वाढ झाली. रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी झाला. मका काडाच्या कंपोस्टिंग प्रमाणेच कृष्णराव यांनी कपाशीच्या पऱ्हाट्यांचेही कंपोस्टिंग करायला सुरुवात केली आहे. त्याचेही चांगले परिणाम दिसून आले आहेत. 

अधिक माहिती साठी संपर्क कृष्णराव काळे : ९६०४७५४६९९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT