Solar Energy Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Energy : नागपूरला सौर जिल्हा करण्यासाठी महावितरणचा पुढाकार

Mahavitaran : घराच्या किंवा कार्यालयीन इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून त्याद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी महावितरणने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Team Agrowon

Nagpur News : जिल्ह्याला सौर जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील बहुतांश घराच्या छतावर सोलर रूफ टॉप असावे, यासाठी ग्राहकांसोबत थेट संवाद साधला जाणार आहे. ग्राहकांना प्रोत्साहित करण्याची मोहीम महावितरणे सुरू केली आहे.

घराच्या किंवा कार्यालयीन इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून त्याद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी महावितरणने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. रूफ टॉप सोलर सिस्टिममुळे घरगुती वीज ग्राहकांचे बिल कमी होते. कधी कधी ते शून्यही होते. छतावरील सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्समधून वीजनिर्मिती होते.

ती वीज घरगुती कामासाठी वापरली जाते. त्यामुळे महावितरणकडून ग्राहकाला कमी वीज घ्यावी लागते व परिणामी बिल कमी होते. जर गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर शिल्लक वीज महावितरणला विकली जाते. त्याचा मोबदला ग्राहकाला मिळतो.

घरगुती ग्राहक सामान्यतः १ ते ३ किलो वॅट क्षमतेची सिस्टिम बसविण्यासाठी उभारलेले स्ट्रक्चर, वायरिंग आदीसाठी एका किलो वॅटला साधारणपणे ५० ते ५५ हजार रुपये खर्च येतो.

यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलो वॅटपर्यंत प्रत्येक किलोवॅटला १८ हजार रुपये अनुदान मिळते. सोलरचा खर्च वीजबिलातील सवलतीमुळे पाच ते सहा वर्षात वसूल होतो. पंचवीस वर्षे त्यातून वीजनिर्मिती होत राहते.

बैठका, मेळाव्याद्वारे जनजागृती

या मोहिमेत वीज ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी महावितरण ठिकठिकाणी बैठका, मेळाव्याद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम राबवीत आहे. सोलर रूफ टॉप यंत्रणा बसविणाऱ्या एजन्सीने देखील पुढाकार घेत मोहिमेत सहभाग घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT