Solar Project Electricity agrowon
ॲग्रो विशेष

Solar Project : सौर प्रकल्प गतीने पूर्ण करावेत महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आदेश

Mahavitaran : महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा मिळावा यासाठी शासनाच्या धोरणानुसार सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सूर्याघर मोफत वीज योजना आणि मागेल त्याला सौरपंप या सौर योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर : महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा मिळावा यासाठी शासनाच्या धोरणानुसार सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सूर्याघर मोफत वीज योजना आणि मागेल त्याला सौरपंप या सौर योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे कृषी ग्राहकांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे या सर्व सौर योजनांच्या प्रगतीकडे प्राधान्याने लक्ष देऊन या प्रकल्पांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वांची मदत घ्या आणि या सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (वितरण) दत्तात्रय पडळकर यांनी दिले.

अहिल्यानगर येथील विद्युत भवनातील सभागृहात महावितरणच्या अहिल्यानगर मंडळातील सर्व अभियत्यांची व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार उपस्थित होते. पडळकर यांच्याकडे नाशिक परिमंडळाचे पालकत्व देण्यात आलेले असून त्यानुसार प्रथमच अहिल्यानगर मंडळाची बैठक घेतली.

यामध्ये विविध विषयांचा व योजनांचा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेतला, मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. त्यानुसार १०० दिवसांत महावितरणाने प्राधान्याने करावयाचे कामाचे नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश दत्तात्रय पडळकर यांनी दिले.

थकबाकीदार ग्राहकांकडून वापरलेल्या वीज देयकांची १०० टक्के थकबाकी वसुली करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा थकबाकीदारां ग्राहकांचा पुरवठा नियमानुसार खंडित करा. वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यापेक्षा विजेचे पैसे वेळेत वसूल करणे महत्त्वाचे असून त्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

‘ग्राहकांना सेवा द्या’
ग्राहकसेवा व वीज देयक थकबाकी वसुली या सर्व कामासाठी सर्व अभियंते व कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयात दररोज वेळेत पोहचून कामाचे दैनंदिन नियोजन केले पाहिजे. नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या कालावधीत ग्राहकांना सेवा न दिल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारासुद्धा त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT