Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Power Supply : अखंडित वीजपुरवठ्यासह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

Electricity : शहरात खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. एक फीडर ट्रीप झाला तर निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे सुमारे १० हजार युनिट विजेचे नुकसान होते.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : अखंडित वीजपुरवठ्यासह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या तसेच वीजचोरी रोखण्यासह महसूलवाढीकडे लक्ष द्या, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांनी दिले. संत एकनाथ रंगमंदिरात नुकत्याच झालेल्या महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील अधिकारी, कर्मचारी तसेच तंत्रज्ञांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. भादिकर म्हणाले, की अत्यावश्यक सेवा क्षेत्रात आपण कार्यरत असून, वीजग्राहकांना अखंडित वीजसेवा देणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे.

वीजपुरवठा खंडित झाला की अभियंते, कर्मचारी बिघाड दुरुस्त करतात. मात्र बिघाडच होऊ नये या दृष्टीने नियोजन करून संपूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्नरत रहावे. वीजबिल थकबाकी वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देश त्यांनी दिले.

श्री. औंढेकर यांनीही कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. शहरात खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. एक फीडर ट्रीप झाला तर निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे सुमारे १० हजार युनिट विजेचे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक अभियंता, तंत्रज्ञाने वीजवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष द्यावे.

वीजग्राहकांच्या घरात वीज पोचवण्यासाठी जवळपास साडेआठ रुपये खर्च येतो तो वसूल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्याचे आश्वासन औंढेकर यांनी याप्रसंगी दिले. प्रज्ञा दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. संवाद मेळाव्यास शहर मंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तंत्रज्ञ तसेच मानव संसाधन व लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT