Agriculture Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Solar Pump : ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’चे उद्दिष्ट १०० दिवसांच्या आत पूर्ण

Solar Pump Scheme : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसांत म्हणजे १६ मार्च २०२५ पर्यंत विविध विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

Team Agrowon

Nashik News : राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दिष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’त ५२,७०५ सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट महावितरणने ६० दिवसांत पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसांत म्हणजे १६ मार्च २०२५ पर्यंत विविध विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

महावितरणने या कालावधीत ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त एकूण १.५ लाख पंप बसविण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. ६ डिसेंबर रोजी ९७,२९५ सौर कृषिपंप बसविण्यात आले होते.

त्यानंतर ४ फेब्रुवारीपर्यंत ५३,००९ सौर कृषिपंप बसविले. त्यामुळे योजनेत आतापर्यंत बसविलेल्या पंपांची संख्या १,५०,३०४ झाली आहे. यामध्ये नाशिक परिमंडळात २२ हजार ५०९ सौरपंप बसविण्यात आले आहेत.

या जिल्ह्यांनी घेतली आघाडी

राज्यात ४ फेब्रुवारीअखेर बसविलेल्या १,५०,३०४ सौर कृषिपंपांमध्ये जालना (१८,४९४ पंप), बीड (१७,९४४), अहिल्यानगर (१३,३६६), परभणी (११,७५५), छत्रपती संभाजीनगर (९,३२९), नाशिक(९,१४३), हिंगोली (८,५३८), धाराशीव (६७६५) आणि जळगाव (६६४८) या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Smart Farming: स्मार्ट शेती : गरज, तंत्रज्ञान आणि भविष्य

Bhusar Market Closure: मार्केट यार्डातील भुसार बाजार २५ फेब्रुवारीला राहणार बंद

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

SCROLL FOR NEXT