Maharashtra Vidhansabha Result Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Vidhansabha Election Result Update : अहिल्यानगरमध्ये विधानसभेला १२ मतदार संघांपैकी ११ ठिकाणी महायुती व एका जागी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला.

मुकुंद पिंगळे, सुर्यकांत नेटके

Ahilyanagar / Nashik News : अहिल्यानगरमध्ये विधानसभेला १२ मतदार संघांपैकी ११ ठिकाणी महायुती व एका जागी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. नाशिकमध्ये १५ मतदार संघांपैकी १४ ठिकाणी महायुतीला कौल मिळाला. संगमनेरमध्ये कॉग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात, नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव झाला.

अहिल्यानगरमधील लक्षवेधी लढतीत संगमनेरमध्ये माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) अमोल खताळ यांनी १०,१६० मतांनी त्यांना पराभूत केले. शिर्डीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांचा पराभव केला.

नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवेसनेचे (एकनाथ शिंदे गट) विठ्ठल लंघे यांनी तर अकोल्यात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) अमित भांगरे यांचा पराभव केला. राहुरीत भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा, पारनेरमध्ये राणी लंके यांचा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) काशीनाथ दाते यांनी पराभव केला.

श्रीरामपूरला काँग्रेसचे हेमंत ओगले विजयी झाले. कर्जत-जामखेडमध्ये अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) रोहित पवार यांनी माजी पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. शेवगाव-पाथर्डीत मोनिका राजळे विजयी झाल्या. अहिल्यानगर शहरात संग्राम जगताप. श्रीगोंद्यात भाजपचे विक्रम पाचपुते जिंकले. कोपरगावात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आशुतोष काळे जिंकले.

नाशिकमध्ये १५ पैकी १४ जागा महायुतीला, १ एमआयएमला मिळण्याची शक्यता आहे. मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे पाचव्यांदा विधानसभेत पोहोचले. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, नरहरी झिरवाळ यांनी हॅटट्रिक साधली. मराठा आरक्षणावरून सर्वाधिक चर्चेत असलेल्या येवल्यात मनोज जरांगे-पाटील यांनीही लक्ष घातले होते.

भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. पालकमंत्री दादा भुसे यांनी अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचा पराभव केला. दिंडोरीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) सुनीता चारोस्कर यांचा तर सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) उदय सांगळे यांचा,

निफाडमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) दिलीप बनकर यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अनिल कदम यांचा, कळवणमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नितीन पवार यांनी ‘माकप’चे जे. पी. गावित यांचा, नाशिक पश्चिममधून भाजपच्या सीमा हिरे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सुधाकर बडगुजर यांचा,

नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाबेत ठाकरे) वसंत गिते यांचा, नाशिक पूर्वमधून भाजपचे राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) गणेश गिते यांचा, चांदवड-देवळामधून भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनी केदा आहेर यांचा, नांदगावमध्ये समीर भुजबळ यांचा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) सुहास कांदे यांनी पराभव केला.

अहिल्यानगरमधील विजयी उमेदवार

राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : डॉ. किरण लहामटे (अकोले), संग्राम जगताप (अहिल्यानगर शहर), आशुतोष काळे (कोपरगाव), काशीनाथ दाते (पारनेर)

भाजप : राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), मोनिका राजळे (शेवगाव- पाथर्डी), विक्रम पाचपुते (श्रीगोंदा), शिवाजी कर्डीले (राहुरी)

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : विठ्ठलराव लंघे (नेवासा), अमोल खताळ (संगमनेर),

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) : रोहित पवार (कर्जत-जामखेड)

काँग्रेस : हेमंत ओगले (श्रीरामपूर)

नाशिकमधील विजयी उमेदवार

भाजप : सीमा हिरे (नाशिक पश्चिम), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), राहुल ढिकले (नाशिक पूर्व), डॉ. राहुल आहेर (चांदवड-देवळा), दिलीप बोरसे (बागलाण)

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : दादा भुसे (शिवसेना), सुहास कांदे (नांदगाव)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : छगन भुजबळ(येवला), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), दिलीप बनकर (निफाड), माणिकराव कोकाटे (सिन्नर), सरोज अहिरे (देवळाली), हिरामण खोसकर (इगतपुरी - त्र्यंबकेश्वर), नितीन पवार (कळवण-सुरगाणा)

एमआयएम : मौलाना मुक्ती (मालेगाव मध्य) (या जागेवर फेरमतमोजनी सुरू होती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

SCROLL FOR NEXT