MPKV Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

MPKV Rating : पाच वर्षांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाला अधिस्वीकृती मिळाली असून विद्यापीठास ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन दिले आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पाच वर्षांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाला अधिस्वीकृती मिळाली असून विद्यापीठास ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन दिले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. अनेक उपक्रम विद्यापीठाकडून राबवले जात आहेत. नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाची बैठक झाली. त्यात विद्यापीठाचा गौरव झाला. विविध महाविद्यालयांतील बीएस्सी (कृषी), पदव्युत्तरच्या कृषी व संलग्न पदव्या, बी. टेक, एम. टेक व आचार्य या पदव्यांच्या विविध विषयांना व महाविद्यालयांना राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने अधिस्वीकृती दिली आहे.

यामध्ये राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, पुणे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर, कृषी महाविद्यालय, धुळे, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, नंदुरबार यांचा समावेश आहे. हे मानांकन देताना राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने जून महिन्यात विद्यापीठ व विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांना प्रत्यक्ष पाहणी केली, यावेळी त्यांनी महाविद्यालयांच्या शैक्षणिक सुविधांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

याप्रसंगी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी समितीसमोर सादरीकरण केले होते. समितीने विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांचे सर्वेक्षण करून मूल्यांकन केले. यामध्ये विद्यापीठस्तरीय तसेच महाविद्यालयांचे प्रशासन, विविध विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांची संख्या, शैक्षणिक उपक्रम, शिक्षणासाठी असलेल्या विविध सुविधा यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनासाठी उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये झालेली निवड व त्यांनी सुरू केलेले उद्योग यांचा समावेश आहे.

अधिष्ठाता (कृषी) डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे, नियंत्रक सदाशिव पाटील, नोडल अधिकारी डॉ. एम. आर. पाटील आणि अधिस्वीकृती मिळालेल्या कृषी व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता यांनी या मानांकनासाठी योगदान दिल्याचे सांगितले जात आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाकडून मिळालेल्या ‘ए’ ग्रेड मानांकनाचा आनंद आहे. विद्यापीठाचे अपुरे मनुष्यबळाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे मानांकन मिळाल्याचे मोठे समाधान आहे. कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्य करणारे शिक्षक आणि शास्त्रज्ञ अभिनंदनास निश्चितच पात्र आहेत.
डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, मफुकृवि, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT