Mahatma Phule Agricultural University Agrowon
ॲग्रो विशेष

Best University Award : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार

Mahatma Phule Agricultural University : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा सन २०२२-२३ चा कृषी व अकृषी विद्यापीठांचे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. महावीरसिंग चौहान यांचाही पुरस्काराने गौरव होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनी २४ सप्टेंबरला पुरस्कार वितरण होईल.

शेतकरी हित समोर ठेवून संशोधनासह विविध बाबीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा नावलौकीक आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. यंदा राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे शासनाने दिलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच २०२२-२३ वर्षासाठीचा राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून राज्य पुरस्कार डॉ. महावीरसिंग चौहान यांना जाहीर झाला आहे. गोंडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील राहिवासी असलेले प्रा. डॉ. महावीरसिंग चौहान ३२ वर्षांपासून प्राध्यापक पदावर विद्यापीठात कार्यरत आहेत.

कृषी रसायनशास्त्र व मृदशास्त्र विषयात एमएस्सी अॅग्री व पीएचडी असून एकूण त्यातील ६ वर्षांपासून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत दहा जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी पदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध समाज व विद्यार्थी हिताचे कार्यक्रम व उपक्रम राबविले आहेत. त्यांची या कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाद्वारे हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

चौहान महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ५५ वर्षांनी त्यांनी विद्यापीठासाठी विद्यापीठ गीत लिहिलेले आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव अरुण आनंदकर, राज्याचे एनएसएसप्रमुख डॉ. नीलेश पाठक आदींनी स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT