Karjmukti Yojana Crop Loan agrowon
ॲग्रो विशेष

Karjmukti Yojana Crop Loan : महात्मा फुले कर्जमुक्ती योजने पीककर्ज फेडणाऱ्या ३६ हजार शेतकऱ्यांवर अन्याय

Kolhapur Farmer : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित होते. लोकप्रतिनिधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडल्यानंतर शासनाने परिपत्रक जाहीर जारी केले.

sandeep Shirguppe

Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana : राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान दिले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित होते. लोकप्रतिनिधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडल्यानंतर शासनाने परिपत्रक जाहीर जारी केले. मात्र यामध्ये एका वर्षात दोनवेळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश आहेत. तीन वर्षात फक्त एकदाच पीककर्ज उचल केलेल्या ३६ हजार शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन लाभासाठी २०१७/१८, २०१८/१९, २०१९/२० हा कालावधी विचारात घेतला. कर्जाच्या मुद्दलेवर जास्तीत जास्त पन्नास हजार, ५० हजारांपेक्षा कमी असल्यास २०१८/१९ व २०१९/२० या वर्षातील कर्ज मुद्दलाच्या रकमेत हा लाभ दिला. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ७७ हजार ३५९ शेतकऱ्यांना ६४४ कोटी ६९ लाख रुपये लाभ मिळाला.

उर्वरित ८० हजार शेतकरी खातेदार अपात्र असण्याची शक्यता होती. पावसाळी अधिवेशनात ११ हजार पात्र लाभार्थ्यांचा विषय झाला. उर्वरित एक लाख शेतकरी खातेदारांना लाभ मिळणार का, असा प्रश्न होता. यासाठी अधिवेशनात आमदार पी. एन. पाटील यांनी विषय मांडला आहे.

यानंतर शासनाने परिपत्रकाद्वारे वर्षात दोनवेळा पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या दोन दिवसांत तपासून तयार ठेवाव्यात. यासाठी सलग तीन दिवस सुट्ट्या असताना सचिवांच्या सुट्टया रद्द करून काम करावे, असे आदेश दिले. डीडीआर कार्यालयाकडून आदेश येताच पोर्टल सुरू होताच पोर्टलवर याद्या अपलोड कराव्या लागतील. तीन वर्षांत दोनदा पीककर्ज घेतलेले असे चौदा हजार शेतकरी खातेदारांना फक्त लाभ मिळेल.

३५ टक्के लाभार्थीना फटका

सहकार उपनिबंधक कार्यालयातील माहितीनुसार, तीन वर्षांत एकदा उचल केलेले ३० ते ३५ टक्के लाभार्थी शेतकरी आहेत. त्यांच्याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. २०१७ ते २०२० पर्यंत तीन वर्षांत फक्त एकदाच पीककर्ज घेऊन वेळेवर परतफेड केली. अशा शेतकऱ्यांची यादी यापूर्वी अपलोड केली आहे. यामध्ये अशा शेतकऱ्यांना वगळले आहे. जिल्ह्यात असे सुमारे ३६ हजार लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे.

वीस वर्षे पीककर्ज काढले व वेळेवर कर्जाची परतफेड केली. मात्र, तीन 66 वर्षात एकदा कर्ज घेतले आणि कर्जाची वेळेवर परतफेड केली. मात्र, आम्हाला अपात्र केले असून लाभ मिळालेला नाही. एकदा कर्ज घेऊन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा. - युवराज पाटील, शेतकरी (रा. उपवडे, करवीर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT