Mahareshim Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Pune : पुणे जिल्हयात रेशीम अभियानास सुरूवात

Mahareshim Abhiyan in Pune : राज्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद, रेशीम संचालनालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबर ते २० डिसेबर या कालावधीत महारेशीम अभियान राबविले जाणार आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : राज्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद, रेशीम संचालनालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबर ते २० डिसेबर या कालावधीत महारेशीम अभियान राबविले जाणार आहे.

पुणे जिल्ह्यात महारेशीम अभियानाची सुरुवात सोमवारपासून (ता. २०) करण्यात आली. पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व रेशीम रथाला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

या वेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे, पुणे जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी संजय फुले, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, विभागीय सांख्यिकी सीताराम कोलते, रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक संदीप आगवणे, वरिष्ठ क्षेत्र सहायक आर. टी. पाटील, क्षेत्र सहायक एस. एस. मैडकर, रिअरिंग ऑपरेटिव्ह एस. आर. तापकीर आदी उपस्थित होते.

पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी म्हणाले, की अभियानकाळात जिल्ह्यामध्ये नव्याने रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यात एकराच्या रेशीम शेतीतून लखपती झालेले असंख्य शेतकरी असून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य रेशीम शेतीमध्ये असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे म्हणाल्या, की सुशिक्षित बेरोजगार शेतकरी युवकांनी नोकरीच्या मागे न धावता रेशीम शेतीकडे वळावे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या कोषांची खरेदी केली जात असल्याने कोष विक्रीकरिता कर्नाटकात जायची आवश्यकता आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून हे अभियान राबविण्यात येत आहे. चालू वर्षीही महिनाभर चालणाऱ्या महारेशीम अभियान कालावधीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्याकरिता जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा.
- संजय फुले, रेशीम विकास अधिकारी, पुणे जिल्हा, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT