Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Export India: महाराष्ट्राचा हापूस जागतिक बाजारात! ४ हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट

Mango Market: महाराष्ट्राच्या हापूस आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे अर्जेंटिनाला पहिल्यांदाच आंबा निर्यात होणार आहे, तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.

गणेश कोरे

Pune News: आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध देशांमध्ये आंबा निर्यातीचे नियोजन केले जाते. तर दरवर्षी एक नवीन देश निर्यातीसाठी खुला केला जातो. पणन मंडळाच्या वतीने नियोजन सुरू झाले असून, यावर्षी विविध देशांमध्ये सुमारे ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर अर्जेंटिना देशामध्ये प्रथमच निर्यात व्हावी यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

कदम म्हणाले, ‘‘पणन मंडळाच्या वतीने राज्यातील शेतीमाल निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी राज्‍यातील कृषी हवामान विभागनिहाय निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून विविध देशांच्‍या निर्यात प्रोटोकॉलनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावर्षीचा आंबा हंगाम लवकरच सुरू होत असून त्यानुसार विविध निर्यात केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. या विविध केंद्रांवर उष्णजल प्रक्रिया, व्हेपर हिट ट्रीटमेंट, विकिरण प्रक्रिया आदी विविध प्रक्रियांच्या चाचण्या झाल्या असून, लवकरच निर्यात सुरू होणार आहे.’’

अमेरिकेचे निर्यात प्रोटोकॉल सेट झाले असून, त्यांचे इन्सपेक्टर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दाखल होऊन, निर्यात सुरू होईल. गेल्या वर्षापासून समुद्रमार्गे यशस्वी आंबा निर्यात झाली होती. यामुळे कमी खर्चात यावर्षी आंबा निर्यातीसाठी निर्यातदार आग्रही राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने अमेरिका निर्यातदारांची तयारी सुरू आहे, असे कदम यांनी सांगितले.

बारामती वरून होणार थेट निर्यात

पणन मंडळाच्या बारामती येथील निर्यात सुविधा केंद्रावर उष्णजल प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधा केंद्रावरून अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांसह युरोपियन देश आणि इंग्लंडसाठी यावर्षी २५० टन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

वाशी, जामसंडे (रत्नागिरी) केंद्रे सज्ज

वाशी आणि जामसंडे ही आंबा निर्यातीची प्रमुख केंद्रे असून, वाशी येथे विकिरण सुविधा उपलब्ध आहे. तर जामसंडे येथे उष्णजल प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असे आहे देशनिहाय उद्दिष्ट

देश --- टन

युरोपियन देश - १७१०

अमेरिका --- १३००

ऑस्ट्रेलिया ७५

जपान --- ७०

दक्षिण कोरिया --- १०

न्यूझीलंड ---- २००

अर्जेंटिना --- १०

मलेशिया --- १०

कॅनडा, सिंगापूर, हॉंगकॉंग आणि आखाती देश --- २००

हवामान बदल, जागतिक तापमान वाढीच्या संकटाचा सामना करत, आंबा निर्यात हंगामाची तयारी झाली आहे. पणन मंडळाच्या वतीने जास्तीत जास्त आंबा विविध देशांना निर्यात होण्यासाठी विविध सुविधा आणि प्रोटोकॉल तयार करण्याच्या सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सर्व सुविधा सज्ज असून, पणन मंडळ, शेतकरी आणि निर्यातदार यंदाच्या हंगामासाठी उत्सुक आहोत.
संजय कदम, कार्यकारी संचालक राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य

यंदाच्या हवामान बदलांचे संकट हंगामावर आहे. तरी अमेरिकेतून असलेली मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर समुद्रमार्गे दर कमी असले तरी हौती दहशतवाद्यांच्या सावटामुळे जहाजांना आपला मार्ग दक्षिण आफ्रिकामार्गे वळवावा लागत आहे. यामध्ये चाळीस दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे विमानमार्गे दुसऱ्या दिवशी आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचत आहे. यामुळे खर्च जास्त असला तरी विमानमार्गे आंबा पाठविणार आहोत, असे आंबा निर्यातदार रेन्बो इंटरनॅशनलचे अभिजित भसाळे यांनी सांगितले.

यावर्षीच्या अमेरिका आंबा निर्यातीसाठीची तयारी सुरू आहे. १ ते २ एप्रिलला अमेरिकेचे इन्स्पेक्टर आल्यानंतर तांत्रिकबाबींची पूर्तता करून निर्यात सुरू होईल. गेल्यावर्षी आम्ही ५५० टन हापूस आंबा निर्यात केला होता. यावर्षी ७५० टनांची तयारी केली आहे.
अभिजित भसाळे, आंबा निर्यातदार, रेन्बो इंटरनॅशनल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT