Dhananjay Munde Resign  Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde Resign : महायुती सरकारला पहिला झटका; अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा स्वीकारला

Dhananjay Munde News : राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री मुंडे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (ता.४) कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामा सुपूर्द केला. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे. परंतु मुंडे यांचं विधिमंडळाचं सदस्यत्व म्हणजेच आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे.

Dhananjay Sanap

Santosh Deshmukh Murder News : मागील ९० दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महायुती सरकारचे राज्य अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून मुंडे यांना मुक्त केलं आहे, असं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं.

याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले," मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा माझ्याकडे दिला आहे. मी त्यांचा स्वीकारला आहे. आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून मुक्त करण्यात आलं आहे." अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ परिसरात पत्रकार परिषदेत दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना मुंडे यांनी नैतिकेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याचं सांगितलं.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे चार्जशीटमधील कौर्याची परिसीमा ओलांडणारे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात सार्वत्रिक संतापाची प्रतिक्रिया उमटली.

तसेच राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला. त्यामुळे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री मुंडे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (ता.४) कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामा सुपूर्द केला. परंतु मुंडे यांचं विधिमंडळाचं सदस्यत्व म्हणजेच आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे. मुंडे यांच्यामहायुती सरकारला पहिला झटका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT